नवी दिल्ली,
Ram Navami उभारण्यात आलेल्या आकर्षक आणि विशाल राम मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे मंदिर अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे की, Ram Navami रामनवमीला सूर्याची किरणे मूर्तीच्या कपाळाला स्पर्श करतील.
सीबीआरआयचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. देबदत्ता घोष यांनी सांगितले की, Ram Navami राम मंदिराच्या संरचनेची निर्मिती आम्हीच तयार केली आहे. पुढील अडीच हजार वर्षांपर्यंत भूकंप आला तरी, त्याच्या पायव्याला काही होणार नाही. मंदिराचे खांब मोठे आहेत आणि भिंतींवर मोठे दगड लावण्यात आले आहेत. मंदिराचा पाया देखील जड दगडांनी मजबूत केला आहे. मंदिराला वरच्या बाजूने अशा प्रकारे मजबूत केले आहे की, भूकंपाचे झटके सहन करू शकेल. भूकंपाचा धक्का बसला तरी मंदिराला काही होणार नाही. मंदिरासाठी ५० मॉडेल्सचा अभ्यास केल्यानंतर अंतिम मॉडेल निश्चित करण्यात आले. Ram Navami राम मंदिर प्रत्येक प्रकारचा भार सहन करू शकले, ज्यात भूकंप आणि वाऱ्याचाही समावेश आहे. मंदिराच्या सुपरस्ट्रक्चरमध्ये जे बंसी पहाडपूर येथील दगड लावण्यात आले आहेत त्याची चाचणी सीबीआरआयमध्ये करण्यात आली आहे.