अयोध्या,
Ayodhya Ram Mandir अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. Ayodhya Ram Mandir या महासोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली असून, फुलांनी तसेच रांगोळ्यांनी सजली आहे.
सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी या Ayodhya Ram Mandir महासोहळ्याला सुरुवात होणार असून, एक वाजता हा विधी संपन्न होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय सहभागी होणार आहेत. या सोहळ्याच्या काळात देश-विदेशातील सुमारे सात हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात देशभरातील साधू-संत आणि अतिमहत्त्वपूर्ण व्यक्तींचा समावेश आहे.
थेट प्रक्षेपण
अयोध्येतील Ayodhya Ram Mandir या महासोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. इतर वृत्तवाहिन्यांही दूरदर्शनच्या सौजन्याने या महासोहळ्याचे प्रसारण करणार आहेत. त्यामुळे लाखो लोकांना घरबसल्यास हा सोहळा पाहता येणार आहे. याशिवाय, ६० देशांमध्ये विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
दिवाळीसारखा उत्सव
सोमवारच्या या महासोहळ्यानिमित्त Ayodhya Ram Mandir केवळ अयोध्या नगरीच नव्हे तर, संपूर्ण देश सज्ज झाला आहे. जणू दिवाळीसारख्या उत्सवाचे वातावरण देशात पाहायला मिळत आहे. घराघरांमध्ये दिव्यांची आरास, विद्युत रोषणाई आणि रांगोळ्यांनी प्रत्येक शहर सुशोभित करण्यात आले आहे.
१४ दाम्पत्यांना यजमानपदाचा मान
देशातील १४ दाम्पत्यांना या महाविशेष सोहळ्यासाठी Ayodhya Ram Mandir यजमानपदाचा मान देण्यात आला आहे. अर्थात्, सोमवारच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हे दाम्पत्य विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.
आज घरोघरी लागणार रामज्योत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सायंकाळी प्रत्येक घरात रामज्योत लावण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. त्यानुसार, सोमवारी घराघरांत रामज्योत लावण्यात येणार आहे.
१० हजार सीसीटीव्ही
प्राणप्रतिष्ठा Ayodhya Ram Mandir सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्या आणि आसपासच्या परिसरात सुमारे १०,००० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जात आहे.