एक राम आहे खरा...!

Jay ShriRam-Ayodhya श्रीरामचरणी आमचा विश्वा

    दिनांक :21-Jan-2024
Total Views |
वेध
- अनिरुद्ध पांडे
 
Jay ShriRam-Ayodhya आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेतील एक महत्त्वाचे नाव आहे, समर्थ रामदास स्वामी. १६०८ मध्ये जन्मलेले रामदास स्वामी मूळचे नारायण सूर्याजी ठोसर. लहानपणापासूनच निस्सीम रामभक्त असलेल्या नारायण ठोसरांनी १२ वर्षे रामासाठी तपश्चर्या केली. Jay ShriRam-Ayodhya असे सांगतात, प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले आणि ‘रामदास' हे नावही दिले. प्रभू रामचंद्र आणि हनुमान हे त्यांचे आराध्य दैवत, तर दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक हे त्यांचे महत्कार्य. आज ४०० वर्षांनंतरही हे त्यांचे लेखनकार्य आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि पुढेही पिढ्यान्पिढ्या करत राहणार आहेत. राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खऱ्या आणि कडव्या रामभक्त रामदासांचे स्मरण स्वाभाविकच आहे. Jay ShriRam-Ayodhya ‘आता नमस्कारीन रामा जो योगियांचे निजधाम।' या शब्दांत समर्थ रामदास प्रभू रामचंद्रांना वंदन करतात. त्यांचे व रामाचे नाते विलक्षण आहे, असे ते मानतात. राम म्हणजे श्रीगुरू आणि आराध्य दैवत असे त्यांचे दुहेरी नाते असल्याचे ते ‘एक राम आहे खरा। तिकडे गुरू परंपरा।' या शब्दांत सांगतात.
 
 

Jay ShriRam-Ayodhya 
 
 
वंदुनी सद्गुरुचरण। करूनी रघुनाथ स्मरण। Jay ShriRam-Ayodhya 
त्यागार्थ मूर्खलक्षण। बोलिजेला।
या ओवीने ते दासबोधातील मूर्ख लक्षणे सांगायला सुरुवात करतात. सद्गुरुचरणांना नमस्कार करून आणि उपास्य रघुनाथाचे स्मरण करून ते मूर्खांची लक्षणे सांगतात. समर्थ रामदास ठिकठिकाणी प्रभू रामचंद्रांचे स्मरण करतात, त्यांना वंदन करतात, त्यांचे संदर्भ देतात. ते असे संत आहेत जे राम आणि हनुमंताची पूजा करून परमार्थ, स्वधर्म, राष्ट्रप्रेमाची शिकवण देतात. असे मानतात की, समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एकमेव संत आहेत, ज्यांनी ‘सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य' या दोन्हींचे महत्त्व सांगितले. Jay ShriRam-Ayodhya त्यांनी भक्तीबरोबरच शक्तीची उपासना करणारे शिष्य निर्माण केले. ‘धटासि असावे धट, उद्धटासि उद्धट' असे थेट बजावणारे ते पहिले विलक्षण संत अशी त्यांची ओळख आहे. रामदास स्वामी हे कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांनी उभी केलेली आध्यात्मिक चळवळ भगवान राम आणि वीर हनुमंताला समर्पित आहे. समर्थांनी त्यांच्या शिकवणीतून लोकांना त्यांच्या कृतीत जागरूक राहण्याची प्रेरणा दिली. Jay ShriRam-Ayodhya राजकारण आणि धर्म या दोन्ही क्षेत्रांत त्यांचा वावर दिसून येतो. रामदासांचे दैवत प्रभू रामचंद्रांचा उल्लेख त्यांच्या ओव्या, अभंगांत ठिकठिकाणी येतो.
 
 
आमुचे कुळी रघुनाथ। रघुनाथे आमुचा परमार्थ।
जो समर्थाचाही समर्थ। देवां सोडविता।।
या शब्दांत आमचे कुलदैवत रघुनाथ आहे, त्याच्या कृपेने आमचा परमार्थ चालला आहे, असे समर्थ म्हणतात. या रघुनाथाचे आम्ही दास आहोत, त्यांची सेवा उपासना केल्यानेच आम्हास ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, हे सांगताना ते म्हणतात,
रघुनाथ भजने ज्ञान झाले। Jay ShriRam-Ayodhya
रघुनाथ भजने महत्त्व वाढले।
म्हणोनिया तुवां, केले पाहिजे आधी।।
सर्व कर्ता करविता श्रीरामच आहे हे अंत:करणात ठरवून आणि श्रीरामाचे स्मरण करून कार्यास आरंभ करावा, म्हणजे ते तत्काळ यशस्वी होते, हे समर्थ रामदास या ओवीत कसे सांगतात पहा, Jay ShriRam-Ayodhya
रघुनाथ स्मरोन कार्य करावे। ते तत्काळची सिद्ध पावे।
कर्ता राम हे असावे। अभ्यंतरी।।
 
 
प्रभू रामचंद्र आणि हनुमंत हे आराध्य दैवत मानणाऱ्या महान कवी असलेल्या समर्थ रामदास स्वामींनी प्रपंच, परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम या विविध विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन केले. Jay ShriRam-Ayodhya हे करताना त्यांनी प्रभू रामचंद्रांची कास कुठेही सोडली नाही.
हनुमंत आमची कुळवल्ली। राम मंडपा वेला गेली।
श्रीरामभक्तीने फळली। रामदास बोले या नावे।।
किंवा
म्हणोनी आम्ही रामदास। श्रीरामचरणी आमचा विश्वास।
कोसळुनि पडो हे आकाश। आणिकाचि वास न पाहे।। Jay ShriRam-Ayodhya
अशा सोप्या शब्दांत ते रामाचे गुणगाण करत असतात. विविध स्तरांवर लोकप्रबोधन करत असताना समर्थ रामदास स्वामी ‘प्रभू रामचंद्रांचा मी पाईक' हे सतत सांगत असतात. राम जन्मभूमी मुक्ती संग्रामातील या सर्वात महत्त्वाच्या दिवशी समर्थ रामदास स्वामींचे स्मरण आणि विनम्र अभिवादन...!
९८८१७१७८२९