अयोध्या, २१ जानेवारी
Ram Mandir Utsav idol तात्पुरत्या मंदिरात ठेवलेली रामललाची जूनी मूर्ती सोमवारी प्राणप्रतिष्ठा केल्या जाणाऱ्या रामाच्या नवीन मूर्तीसमोर ठेवली जाणार आहे. Ram Mandir Utsav idol ती उत्सव मूर्तीच्या स्वरूपात असणार आहे, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली.
राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत १,१०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे गिरी यांनी सांगितले. रामललाची ५१ इंच उंचीची मूर्ती मागील आठवड्यात मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात आली. Ram Mandir Utsav idol म्हैसूर येथील मूर्तिकार अरुण योगराज यांनी श्रीरामाच्या तीन मूर्ती तयार केल्या. त्यापैकी एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
उर्वरित दोन मूर्तींचे काय, असा प्रश्न विचारला असता, आम्ही त्या दोन्ही मूर्ती सन्मान आणि आदरपूर्वक मंदिरात ठेवणार आहोत, असे न्यासने सांगितले. रामाची मूळ मूर्ती रामललाच्या समोर ठेवली जाईल. मूळ मूर्ती अतिशय महत्त्वाची आहे. Ram Mandir Utsav idol ती पाच ते सहा इंच उंच आहे आणि २५ ते ३० फूट अंतरावरून ती दिसणारही नाही. त्यामुळे आम्हाला मोठ्या मूर्तीची गरज होती, असे गिरी यांनी सांगितले. राम मंदिराच्या बांधकामासाठी किती खर्च आला, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, यासाठी १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे आणि उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज आहे. एका मजल्याचे काम पूर्ण झाले, दुसऱ्या मजल्याचे बांधकाम आम्ही करणार आहोत.
अरुण योगराज यांनी तयार केलेल्या तीन मूर्तींपैकी एकाची निवड करणे आमच्यासाठी अत्यंत कठीण होते. त्या तीनही मूर्ती अतिशय सुरेख आणि सुबक आहेत. आम्ही ठरविलेल्या निकषांप्रमाणे त्या मूर्ती आहेत, असे गिरी यांनी सांगितले. चेहरा बालरूपाचा तसेच तो तेजपुंज असावा हा पहिला निकष होता. श्रीराम अजानबाहू होते. त्यामुळे मूर्तीतही त्यांचे हात गुडघ्यापर्यंत असावेत, हा दुसरा निकष होता.