स्वत:ला श्रीरामाची प्रेमिका मानतात हे पुरुष !

ram-rasik-ayodhya सखा भावनेने करतात रामोपासना

    दिनांक :21-Jan-2024
Total Views |
अयोध्या,
 
ram-rasik-ayodhya श्रीकृष्णाची आराधना करणाऱ्यांमध्ये बहुतांश भक्त, सखा भावनेतून त्याची उपासना करतात. श्रीरामाचे भक्त बहुतांश अशी आराधना करीत नाहीत. ram-rasik-ayodhya पण, अयोध्येतील एक भक्त संप्रदाय असाही आहे की, जो श्रीरामाला सखा, प्रियकर मानतो आणि विशेष म्हणजे हे सर्व पुरुष आहेत. ram-rasik-ayodhya अयोध्येच्या कनक भवन मंदीरात हे भक्त आपल्या पद्धतीने उपासना करतात.
 

ram-rasik-ayodhya 
 
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. अयोध्येत ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ram-rasik-ayodhya  कनक भवन मंदीरातही तयारी पूर्ण झाली असून, श्रीरामाप्रती अत्यंत प्रेमभावनेने ही तयारी केली जात आहे. आत्मा आणि परमात्म्याचे तत्त्व एकत्र येते ते याच प्रेमभावनेतून ! असे म्हणतात की, कनक मंदीर भवन माता कैकयी आणि राजा दशरथांनी जानकीला ‘मुंह दिखाई'मध्ये दिले होते. श्रीराम-जानकी वनवासात जाण्यापूर्वीपर्यंत याच भवनात रहात होते.ram-rasik-ayodhya
 
 
श्रीरामावर सखा म्हणून प्रेम करणारा ‘राम रसिक' संप्रदाय याच मंदीरात भगवंताची उपासना करतो. राम रसिक संप्रदायातील भाविक श्रीरामाला प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानतात. विशेष म्हणजे या संप्रदायातील पुरुष स्वत:ला स्त्री मानून, श्रीरामाची उपासना करतात. ram-rasik-ayodhya ते स्वत:ला श्रीरामाची साळी आणि प्रभूला आपले जिजाजी मानतात. रामरायाची आरती करताना, हे पुरुष डोक्यावरून पदर घेतात. राम रसिकांची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे. संतकवी रामानंद यांनी हा संप्रदाय एकत्रित केला. १७ व्या शतकाच्या शेवटी, त्यांचे शिष्य कृष्णदास यांनी जयपूरजवळ आश्रम आणि गादीची स्थापना केली.
 
 
संतकवी रामानंद यांचे शिष्य अग्रदास यांनी राजस्थानातील विविध भागांमध्ये जाऊन रसिक संप्रदायाची स्थापना केली. ram-rasik-ayodhya नंतरच्या काळात या संप्रदायाचा प्रचार-प्रसार अयोध्या, जनकपूर आणि चित्रकूटमध्ये झाला. कनक भवन मंदीरात प्रभू श्रीराम केवळ विजयादशमीला शस्त्र हाती घेतात. उर्वरीत दिवस ते माता जानकीचे पती, या साळ्यांचे जिजाजी आणि जगाचे स्वामी आहेत. राम रसिक संप्रदायाचे लोक श्रीरामाची भक्ती करीत नाहीत तर त्याच्यावर प्रेम करतात. या उपासनेत मंदीरात विवाह कविता, गाणी आणि पदं गायली जातात.