तुरीच्या गंजीला आग, पपईची झाडे कापली

23 Jan 2024 20:42:13
तभा वृत्तसेवा
नांदगाव पेठ,
Turi Crop : अज्ञात मनोविकृताने एका शेतातील तुरीच्या गंजीला आग लावून बाजूच्या शेतातील पपईची शेकडो झाडे कापून फेकली तसेच शेतातील किटकनाशक औषध, स्प्रिंकलर पाईप सुद्धा विहिरीत टाकून शेतकर्‍यांचे पावणेदोन लक्ष रुपयांचे नुकसान केले. रविवारी मध्यरात्री संगमेश्वर शेतशिवारात ही घटना घडली. घटनेची नांदगाव पेठ पोलिसांनी नोंद केली असून त्या मनोविकृताचा शोध घेत आहे.
 
Turi Crop
 
कोकिळा रमेश साकोरे (47) रा. संगमेश्वरपुरा नांदगाव पेठ, संजय मुळे (50) बारीपुरा नांदगाव पेठ असे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे नाव आहे. कोकिळा साकोरे यांची संगमेश्वर शेतशिवारात शेती असून त्यांच्या शेतात Turi Crop तुरीची गंजी झाकून ठेवण्यात आली होती. शनिवारी मध्यरात्री अज्ञात मनोविकृताने गंजीला आग लावून शेतात असलेले किटकनाशक विहिरीत टाकून दिले, तर संजय मुळे यांच्या शेतात लावलेले पपईची शेकडो झाडे कुर्‍हाडीने तोडून स्प्रिंकलर पाईप विहिरीत फेकून दिले. यामध्ये शेतकर्‍यांचे पावणे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
 
सोमवारी पहाटे शेतकरी मनोज हटवार शेतात गेले असता त्यांना हा Turi Crop प्रकार दिसल्यानंतर त्यांनी तातडीने शेतमालक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक मोहन चोखट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0