‘घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा..!’

    दिनांक :24-Jan-2024
Total Views |
- नमो चषक 2024 चे उद्घाटन थाटात

राळेगाव, 
राळेगाव शहरातील शिवशक्ती मैदानावर ‘घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा‘ Namo Cup 2024 नमो चषक 2024 मध्ये खुल्या टेनिसबॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांचे उदघाटन बुधवार, 24 जानेवारी रोजी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, डॉ. कुणाल भोयर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव आकाश धुरट, बंटी गुप्ता, आर्यन राठोड, रवी मेटकर, माजी सभापती प्रशांत तायडे, संजय काकडे, बबन भोंगारे, प्रीतेश वर्मा, उमेश पांपट्टीवार, गजानन लढी, विजय येनोरकर यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
 
 

Namo chashak
 
Namo Cup 2024 : सुरवातीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोबतच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. आमदार डॉ. अशोक उईके, भाजयुमो प्रदेश सचिव आकाश धुरट यांनी उद्घाटनीय समारंभाचा क्रिकेट सामना खेळून दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय करून घेतला. त्यानंतर प्रथम सामना खेळविण्यात आला व सामन्याचा प्रारंभ झाला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या मार्गदर्शनात प्रीतेश वर्मा यांच्या सहकार्याने या नमो चषक 2024 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांचे स्वागत निलय घिनमिने, अरुण शिवणकर यांनी केले. तर कार्यक्रमाने सूत्रसंचालन निखिल राऊत, तर प्रास्ताविक शुभम मुके यांनी केले. या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन सोहळ्याला राळेगाव शहरातील असंख्य मान्यवर मंडळी, तसेच क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.