यवतमाळ,
Santshrestha Dnyaneshwar Maharaj : ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा दिव्य संदेश देणारे थोर तत्त्वज्ञ, विचारवंत वामनराव पै यांच्या जीवनविद्या तत्त्वज्ञानावर आधारित जाहीर समाज प्रबोधन, शनिवार, 27 आणि रविवार, 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4.30 ते 8 वाजता शिवाजीनगर मैदान, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती नामसाधक दशरथ शिरसाठ यांनी दिली. पत्रपरिषदेत बोलताना शिरसाठ म्हणाले, ‘आजि सोनियाचा दिनु आणि सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित’ या विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे मार्गदर्शन होणार आहे.
55 व्या Santshrestha Dnyaneshwar Maharaj संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवस जीवनविद्येचे मौलिक मार्गदर्शन होणार आहे. जीवनविद्येचा प्रचार प्रसार करण्यासाठी व लोक सुखी व्हावेत या शुद्ध भावनेतून मुंबई, नागपूर, पुणे, मलकापूर, अचलपूर या ठिकाणांहून 130 नामधारक यवतमाळात दाखल झालेले आहेत व घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे प्रेमपूर्वक निमंत्रण देत आहेत. समस्त यवतमाळवासींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीवनविद्या मिशन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी नामसाधक सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम मुत्यमवार, प्रकाश वीरकर उपस्थित होते.