तभा वृत्तसेवा
वर्धा,
Wardha Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन ईमारत फर्निचरसह वापरासाठी तयार झाली आहे. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीपासून नवीन ईमारतीतून होणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन नवीन ईमारतीत सकाळी 8.20 वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयायाची Wardha Collector Office नवीन ईमारत बांधण्यासाठी जुनी ईमारत पाडण्यात आली होती. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ईमारतीतून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज चालविण्यात येत आहे. नवीन भव्य व प्रशस्त ईमारत बांधून तयार झाली आहे. ईमारतीचे राहिलेले फर्निचरचे काम देखील आता पुर्णत्वास आले आहे. त्यामुळे या ईमारतीतून कामकाजास प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करुन सुरुवात होणार आहे.
उद्या जिल्हाधिकारी, Wardha Collector Office अपर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची कार्यालये नवीन ईमारतीत स्थलांतरित होणार आहे. उपविभागीय अधिकारी व प्रशासकीय ईमारतीत असलेली महसूल विभागाची अन्य कार्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत नवीन ईमारतीत स्थलांतरित होणार आहे.
नवीन ईमारत 43 कोटी 11 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आली आहे. भारतीय स्थापत्य शैलीत ईमारतीचे बांधकाम असून सार्वजनिक जागा वगळा संपुर्ण ईमारत वातानुकूलीत करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. ईमारतीत 100 आसन क्षमतेचा बैठक कक्ष, अधिकार्यांचे सुसज्ज कक्ष आहेत. Wardha Collector Office इमारतीच्या मागील भागात नियोजन भवनाची रचना करण्यात आली आहे. त्यात 300 व्यक्ती बसू शकतील, अशी आसन व्यवस्था आहे.