वाघाच्या हल्ल्यात स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू

ताडोबा (बफर) क्षेत्रातील घटना

    दिनांक :25-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
worker killed in tiger attack ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील अस्थायी स्वच्छता कर्मचार्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरूवार, 25 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. राम रामचंद्र हनवते (54) असे मृतकाचे नाव असून, ते निमढेला येथील रहिवासी होते.
 

worker killed in tiger attack  
 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून ते अस्थायी स्वच्छता कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत होते. तर, त्यांचा मुलगा रंजीत हनवते हा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. worker killed in tiger attack आपले काम आटोपून विश्राम करीत असताना कक्ष क्रमांक 58 मध्ये अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळ परिसरात उपस्थित पर्यटकांसमोरच वाघाने त्यांना फरफटत जंगलात नेले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी चमुसह घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा केलाा असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी वृत्तलिहिस्तोवर घटनास्थळी भेट द्यायचे होते. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होताच मृतकाच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती धानकुटे यांनी दिली.