आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने तेंडोळी सन्मानित

ग्रामसेवक विजय ठेंगेकर यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार

    दिनांक :25-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
Adarsh ​​Gram Panchayat Award : वडारवाडीची स्पर्श सेवाभावी संस्था 2016 पासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून समाजहित जोपासणार्‍या विविध संस्था व व्यक्ती यांच्या कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात पुरस्कार देऊन सन्मान करते. यावर्षीच्या सन्मानासाठी आर्णी पंचायत समिती अंतर्गत तेंडोळी ग्रामपंचायतची निवड होऊन राज्यस्तर आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार आणि याच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजय ठेंगेकर यांना राज्यस्तर प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन अहमदनगर येथे देऊन सन्मानित करण्यात आले.
 
Adarsh ​​Gram Panchayat Award
 
तेंडोळी ग्रामपंचायतने Adarsh ​​Gram Panchayat Award  गेल्या दोन वर्षांमध्ये राबविलेले शासकीय, निमशासकीय आणि नावीन्यपूर्ण उपक‘मांसोबतच पंधरावा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन या शासकीय योजनांची अंमलबजावणी, आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, माझी वसुंधरा उल्लेखनीय आहेत. तर बालकांसाठी दिवस तुझे हे फुलायचे, तरुणांसाठी तू नव्या जगाची आशा, महिलांसाठी घे भरारी, शेतकर्‍यांसाठी रडणार नाही तर लढणार अशा सर्वांगीण घटकांच्या विविध उपक‘मांची दखल घेऊन, एक उपक‘मशील आदर्श ग्रामपंचायत म्हणून तेंडोळीची निवड करण्यात आली.
 
 
तर विजय ठेंगेकर हे एक उपक्रमशील ग्रामसेवक Adarsh ​​Gram Panchayat Award  म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध ग्रामपंचायतींना विविध उपक‘म राबवून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामपुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून दिले आहेत. त्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक, मनुष्यबळ विकास लोकसेवा समितीचा राज्य आदर्श ग्रामसेवक पुरस्कारदेखील यापूर्वी मिळाला आहे.
 
 
विजय ठेंगेकर शाळेत असल्यापासून साहित्य क्षेत्रात Adarsh ​​Gram Panchayat Award  आहेत. ते आकाशवाणीसह वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन, कथालेखन करीत असून त्यांना राज्य साहित्यरत्न पुरस्कारासह अनेक पुरस्कारप्राप्त आहेत. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच सपना राठोड, उपसरपंच भगवान निकुरे, सदस्य परशराम राठोड, प्रल्हाद राठोड, संतोष आडे, विद्या कोलते, सुनीता चव्हाण, कर्मचारी जितेश चव्हाण उपस्थित होते. यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ व ग्रामसेवकांचे अभिनंदन होत आहे.