तभा वृत्तसेवा
वणी,
Dasavatar folk drama प्रभू श्री रामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवाच्या निमित्ताने येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात प्राचार्य राम शेवाळकर रंगमंचावर कोकणातील बाळकृष्ण दशावतार मंडळाने रामायणातील श्री हनुमान व शंखपाळ कन्या रुई यांच्या विवाह प्रसंगावर सर्वांग सुंदर अशा लोकनाट्याचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश वंदनेनंतर दशावतार मंडळाचे सुहास माळकर यांच्या विदर्भ साहित्य संघ वणी शाखेच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माधव सरपटवार, रंगभूमी मंडळाचे सदस्य डॉ. दिलीप अलोणे, आयोजक विजय चोरडिया, विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजीत अणे उपस्थित होते. Dasavatar folk drama यावेळी दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल विजय चोरडिया यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माधव सरपटवार, विजय चोरडिया व डॉ. दिलीप अलोणे यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले. डॉ. अभिजित अणे यांनी संचालन केले. अशोक सोनटक्के यांनी आभार मानले.
या कार्यक‘मात दशावतार मंडळाने रामायणातील हनुमान विवाह कथा नाट्याचे नाट्यमय सादरीकरण केले. यात सुहास माळकर, सतीश केळुसकर, बाळू कोचरेकर, गिरीधर गावकर, आनंद कोरगावकर, केशव खांबल, बाबली अखेरकर, गोत्या चव्हाण यांनी शंखपाळ, प्रभू राम रुई, नारदमुनी, श्री गणेश, हनुमान पार्वती यांच्या भूमिका अतिशय समर्थपणे ऊभ्या केल्या. अनंत घाडीगावकर, बाळू राणे, संदेश परब यांनी संगीत साथ दिली. कलावंतांच्या अभिनय आणि वेशभूषा अतिशय देखणी होती. रसिकांच्या प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक‘मासाठी शुभम डोंगरे, उमेश पोद्दार व राजू यांनी परिश्रम घेतले.