अयोध्येत जमिनीला आला सोन्याचा दर

28 Jan 2024 18:37:50
- तीन महिन्यांत भाव गगनाला
 
अयोध्या, 
राम मंदिराचा परिणाम Ayodhya Property Rates अयोध्येतील मालमत्तेवरही स्पष्ट दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत येथील मालमत्तेच्या किमती 179 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अयोध्येतील मालमत्तेची किंमत ऑक्टोबर 2023 मध्ये 3,174 रुपये प्रती चौरस फूट होती, जी आता जानेवारीमध्ये वाढून 8,877 रुपये प्रती चौरस फूट झाली आहे.
 

Ram Mandir 
 
Ayodhya Property Rates : अयोध्येतील निवासी मालमत्तांच्या शोधात 6.25 पट वाढ झाली आहे. यावरून अयोध्येतील निवासी मालमत्ता खरेदीकडे लोकांची उत्सुकता वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अयोध्येतील स्थानिक रिअल इस्टेट ब्रोकर अमितसिंह म्हणाले, गेल्या 5-6 वर्षांत दरात कोणताही बदल झालेला नाही. आता मार्केट रेट खूपच जास्त आहे. शहराच्या काही भागांत हे दर इतके वाढले आहेत की, स्थानिकांना मालमत्ता खरेदी करणे कठीण झाले आहे.
 
 
ते म्हणाले, राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गेल्या सहा महिन्यांत मालमत्तेच्या किमती अतिशय उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी इतर अनेक जिल्ह्यांतून व भागांतून येणार्‍या खरेदीदारांनी येथे चढ्या दराने मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत.
 
 
Ayodhya Property Rates : मालमत्तेतील सर्वाधिक गुंतवणूक जमिनीत होत आहे. स्थानिक दलालांचे म्हणणे आहे की, शहराव्यतिरिक्त फैजाबाद रोड, चौदा कोसी परिक‘मा, रिंग रोड, नयाघाट आणि लखनौ-गोरखपूर महामार्गाच्या आसपास लोक मालमत्ता खरेदी करीत आहेत. हे क्षेत्र राम मंदिराच्या 6-20 किलोमीटरच्या परिघात आहे. त्यामुळे येथे गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढत आहे.
मालमत्ता नोंदणी
अयोध्या जिल्ह्याच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागानुसार, 2017 ते 2022 पर्यंत मालमत्ता नोंदणीमध्ये 120 टक्के वाढ झाली असून, 2017 मध्ये अयोध्येत एकूण 13,542 मालमत्तांची नोंदणी करण्यात आली, तर 2022 मध्ये ही सं‘या 20,889 मालमत्तांवर पोहोचली. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी अ‍ॅनारॉक समूहाच्या मते, जमिनीचा दर 1,000 ते 2,000 रुपये प्रती चौरस फूट होता, जो आता 4,000 ते 6,000 रुपये प्रती चौरस फूट झाला आहे.
Powered By Sangraha 9.0