वाशीम,
MP Bhavna Gawli : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्या पुढाकारातून व सर्वपक्षीय, सर्वधर्मिय, विविध सामाजिक संघटना तथा शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचे कामास सुरुवात झाली़ सदर पुतळा उभारणीच्या कामात अधिक गती यावी यासाठी जन शिक्षण संस्थान येथे नियोजन बैठक उद्या, ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे़ या बैठकीस सर्वपक्षीय, सर्वधर्मिय सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा़ भावना गवळी यांनी केले आहे़.
शिव छत्रपतींचा अश्वारुढ पुतळ्याचा पायाभरणी सोहळा २३ जानेवारी रोजी शहरातील अकोला नाका परिसरात संपन्न झाला. सदर पुतळ्याचे शिवजयंती दिनी अर्थात १९ फेब्रुवारी रोजी विमोचन करण्याच्या दृष्टीने जलदगतीने काम सुरू झाले आहे. मात्र, पुतळा उभारणीच्या कार्यात अधिक सुसुत्रता यावी त्यानुषंगाने सदर बैठकीत सुचना अपेक्षित आहेत़ त्यासाठी नियोजन करण्याकरिता शिवसेना पक्षनेत्या खा. भावना गवळी MP Bhavna Gawli यांच्या मार्गदर्शनाखाली ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ या बैठकीस सर्वपक्षीय, सर्वधर्मिय, विविध सामाजिक संघटना तथा शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे़.