- देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई,
स्थानिक नवोदित युवकांमधील कौशल्य विकास वाढवणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती तसेच रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी व्हावी यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांत ‘कौशल्य रथ’च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि पुष्पांचल फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘कौशल्य रथ’चे उद्घाटन फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.
Devendra Fadnavis फडणवीस म्हणाले की, ‘कौशल्य रथ’चा प्राथमिक उद्देश रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढवण्यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांतील युवकाना करिअर मार्गदर्शन करणे, त्यासंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल. कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध कौशल्य क्षेत्रीय परिषदांच्या अंतर्गत चालविण्यात येणार्या कौशल्य विषयक अभ्यासक्रमासाठी युवक युवतींची नोंदणी करणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करणे याकरिता ‘कौशल्य रथ’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानांतर्गत नियोक्ते आणि नोकरी शोधणारे यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी व्यक्तींसाठी ‘कौशल्य रथा’द्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या आठ जिल्ह्यांमध्ये पाच बसेसचा वापर करून महाविद्यालयांमध्ये थेट नावनोंदणी सत्रे आयोजित केली जाणार आहे.