150 किलोमीटर चालत अयोध्येला पोहोचले 350 मुस्लिम भाविक

रामललाचे घेतले दर्शन

    दिनांक :31-Jan-2024
Total Views |
लखनौ,
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिरात पूजेसाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असताना, 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'शी संबंधित 350 जणांनी 150 किलोमीटर पायी प्रवास करून रामललाचे दर्शन घेतले. मुस्लिम राष्ट्रीय मंचचा हा गट 25 जानेवारी रोजी लखनौ येथून निघाला होता आणि दररोज 25 किलोमीटर चालत मंगळवारी अयोध्या येथे पोहोचला.
 
(Ayodhya Ram Mandir)
 
संघटनेचे प्रभारी शाहिद सईद यांनी आज सांगितले की, 350 मुस्लिम भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या डोळ्यात 'अभिमानाचे अश्रू' आणि मुखावर (Ayodhya Ram Mandir) 'जय श्री राम'चा नारा होता. या संघाचे नेतृत्व मंचाचे निमंत्रक राजा रईस आणि प्रांतीय संयोजक शेर अली खान यांनी केले. निवेदनानुसार, या सहा दिवसांच्या प्रवासात दररोज 25 किलोमीटरचे अंतर कापले गेले. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी सांगितले की, श्री रामाच्या अध्यात्मिक दर्शनाचा हा क्षण त्यांच्या आयुष्यभर सुखद स्मृती म्हणून राहील.
 
 
मंचचे निमंत्रक राजा रईस म्हणाले की, राम हे आपल्या सर्वांचे पूर्वज होते, आहे आणि राहणार आहे. आपला देश, आपली सभ्यता, आपली राज्यघटना एकमेकांमध्ये द्वेषाची शिकवण देत नाही, असा मुस्लिम राष्ट्रीय मंचचा विश्वास आहे. एखादी व्यक्ती दुसऱ्या (Ayodhya Ram Mandir) धर्माच्या प्रार्थनास्थळी किंवा पूजास्थळी गेली तर त्याने आपला धर्म सोडला आहे असे समजू नये. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे हा गुन्हा आहे का? हा गुन्हा असेल तर प्रत्येक भारतीयाने हा गुन्हा केला पाहिजे, असे मंचाचे मत आहे.