बाबा जुमदेवजीच्या संमेलनातून सेवाभाव, सदाचाराची शिकवण

31 Jan 2024 19:10:33
तभा वृत्तसेवा
मोहाडी, 
Shubhangi Sunil Mendhe : जिथे अध्यात्म असते, तिथे स्नेहभाव निरंतर पाझरत असतो. बाबा जुमदेवजी यांच्या सेवकांच्या संमेलनात सहभागी होऊन हृदय भरून आले. सेवा आणि सदाचाराची शिकवण देणा-या या संमेलनातून घडणारे प्रत्येक कार्य ईश्वरीय आहे, असे प्रतिपादन मोहाडी येथे परमात्मा एक सेवक संमेलनप्रसंगी शुभांगी मेंढे Shubhangi Sunil Mendhe यांनी बोलतांना व्यक्त केले. ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवकांच्या 26 व्या भव्य सेवक संमेलनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
 
Shubhangi Sunil Mendhe
 
समाज जीवनात प्रत्येक ठिकाणी मातृशक्ती आपला ठसा उमटविते. येथेही मातृशक्तीची उपस्थिती दर्शविणारा सहभाग नजरेत भरणारा आहे. आज समाज जीवनात वाईट व्यसन दूर करण्यासाठी परमात्मा एक चांगले कार्य करीत आहे. धर्मांचे भाग असलेले मातृधर्म, पितृधर्म करीत असलेले कर्तव्य आणि मग तुमचा शेजारी पण धर्मच आहे. स्नेह हा देखील धर्मच आहे आणि अशा सगळ्या धर्मांच पालन करू तेव्हा हा समाज उभा राहील, म्हणून कर्म धर्मावर विश्वास ठेवा. आचरणात आत्म्याची ज्योती ही परमपूज्य असावी म्हणून परमात्मा असं नाव देऊन आपण या सगळ्या गोष्टी करतो. सेवक संमेलनासाठी एकत्र आलेल्या सर्व सेवकांचे Shubhangi Sunil Mendhe शुभांगी मेंढे यांनी यावेळी कौतुक केले.
 
 
या प्रसंगी आध्यात्मिक प्रमुख लता बुरडे, यशवंतराव ढबाले, नरेश सव्वालाखे, मोरेश्वर सार्वे, नरेश ईश्वरकर जि. प.सदस्य, छाया डेकाटे, ज्योतिष नंदनवार नगरसेवक, दिशा निमकर, सविता साठवणे, प्रीती मलेवार, दिनेश निमकर, मंगेश पारधी, यशवंत थोटे, उमेश मोहतुरे व मोठ्या संख्येने सेवक-सेविका गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0