विद्यार्थ्यांना शिकविणे ही एक साधना

- रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमाला
- डॉ. प्रबोध येळणे यांचे प्रतिपादन

    दिनांक :04-Jan-2024
Total Views |
नागपूर,
Ramabai Ranade Memorial : विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. बदलत्या युगात मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची असून विद्यार्थ्यांना शिकविणे ही एक साधना असल्याचे स्पष्ट मत अध्यात्मिक मानसोपचारतज्ञ डॉ. प्रमोद येळणे यांनी व्यक्त केले.
 
Ramabai Ranade Memorial
 
सेवासदन शिक्षण संस्थेच्या परिसरात कै. डॉ. वसंतराव वांकर व कै. डॉ. कुसुमताई वांकर पुरस्कृत रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. बदलत्या युगात मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका, हा Ramabai Ranade Memorial व्याख्यानाचा विषय होता. यावेळी मंचावर एक्वाडेस स्ट्रक्चरल कन्सल्टंट प्रा.लि. च्या संचालक मीनल देहाडराय, संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करण्याचे कर्तव्य कधीच विसरू नयेत. उच्च पदावर पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करण्याची तयारी सुध्दा विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे स्पष्ट प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीनल देहाडराय यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सावित्रीबाई फुले व रमाबाई रानडे Ramabai Ranade Memorial यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. सेवासदन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री रामधूनचे सुंदर सादरीकरण केले.
 
 
कार्यक्रमाचे संचालन अजय चव्हाण, वैयक्तिक गीत यशोदाबाई खरे अध्यापक विद्यालयाची प्रगती पाठक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रणय मालविय यांनी तर आभार अ‍ॅड. उमेश अंधारे यांनी मानले. बाळकृष्ण गड्डमवार यांनी Ramabai Ranade Memorial वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी कांचन गडकरी यांच्या मातोश्री पुष्पा तोतडे, निलेश साठे, कमलाकर देशपांडे, सतीश मेंढे, नानासाहेब आखरे, नानासाहेब खरे, संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत, डॉ. समय बनसोड, डॉ. कल्पना उपाध्याय, साधना हिंगवे, डॉ. मनीषा यगरानवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.