अखेर मोरारजी टेक्स्टाईल्सच्या कामगारांना मिळाले वेतन

तरुण भारतचे मानले विशेष आभार

    दिनांक :04-Jan-2024
Total Views |
नागपूर,
 
Morarji Textiles मोरारजी टेक्स्टाईल्स कंपनीत कार्यरत 2 हजार कामगारांना अखेर गुरुवारी वेतन देण्यात आले.यामुळे कंपणीच्या सर्व कामगारांनी दैनिक तरुण भारतचे विशेष आभार मानले आहे. 2 महिन्यापासून कामगारांचे वेतन थांबविण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर इंडियन बँकेने सर्व कामागारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. दोन महिन्यापासून प्रलंबित वेतन मिळाल्याने दोन हजार कामगार कुटुंबियांनी पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला.
 

Morarji Textiles   
मुख्यत: दिवाळीपासून कामगारांना वेतन न मिळाल्याने कामगारांनी अशोक पिरामल ग्रुप व इंडियन बँकेकडे आपला संताप व्यक्त केला होता. वेतनाचे पैसे मिळावेत,यासाठी कामगारांनी सातत्याने पाठपुरावा केला. बँकेत वेतनाचे पैसे जमा झाले असताना कामगारांना वेतनासाठी प्रतिक्षा करावी लागली. मोरारजी टेक्सटाइल्स कंपणीत कॉटनचे कपडे तयार केल्या जाते. हा संपूर्ण कारखाना बुटीबोरी येथे असून 6 महिन्यांहून अधिक काळ पर्यंत कंपणीतील कामगारांनी संप पुकारला होता. Morarji Textiles कंपणी व कामगार नेत्यांच्या चर्चेनंतर ऑक्टोबर - 2023 च्या शेवटच्या आठवड्यात कंपनीने पुन्हा काम सुरू केले आहे. मोरारजी टेक्स्टाईल्सचे 2 हजार कामगार वेतनापासून वंचित मात्र कंपनीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे सर्व कामगारांचे वेतन जवळपास 3 कोटी रुपये इंडियन बँक मुंबईकडे पुढील वितरणासाठी जमा केले. परंतू अद्यापपर्यंत बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही कामगारांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. मोरारजी टेक्स्टाईल्स कंपनीत यापूर्वी सुध्दा विविध कारणांनी आंदोलन झाले आहे. पगार, बोनस आदी मागणीसाठी कामबंद आंदोलन झाले आहे.