तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-zp-school जिल्हा परिषदेच्या शाळेतील कमी पटसंख्येचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. त्यावर राज्य शासनाने समूह शाळेचा पर्याय शोधला आहे. yavatmal-zp-school जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १६ समूह शाळा निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. yavatmal-zp-school शिक्षण आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी याबाबतचे प्रस्ताव सर्व जिल्ह्यांकडून मागविले होते. राज्यभरातील एकंदर १४ हजार कमी पटसंख्येच्या शाळा विचारात घेऊन आयुक्तांनी हा आदेश दिला होता. yavatmal-zp-school यात यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे सव्वादोनशे शाळा बंद होतील असा अंदाज आहे.
जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने नुकताच १६ समूह शाळांचा प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. yavatmal-zp-school एका समूह शाळेत संबंधित परिसरातील १० ते १४ शाळा समाविष्ट केल्या जाणार आहेत. याबाबत शिक्षण विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. एखादी कमी पटाची शाळा समूह शाळेत समाविष्ट करण्यासाठी संबंधित गावकऱ्यांची संमती आवश्यक असणार आहे. yavatmal-zp-school त्याचबरोबर पाल्यांना समूह शाळेत पाठविण्यासाठी पालकांचेदेखील संमतीपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच समाविष्ट होणाऱ्या लहान पटसंख्येच्या शाळा व्यवस्थापन समितीकडून संमतीपत्र किंवा ठराव घेणेही आवश्यक राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.yavatmal-zp-school