मानोरा,
Akshata Kalash : अयोध्या नगरीमध्ये भगवान श्रीरामांच्या भव्य नवनिर्मित मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची आस सकल हिंदू धर्म बांधवांना लागली असून २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणाचा शुभ संदेश घेऊन आलेल्या मंगल अक्षतांच्या कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
येथील जुनी वस्ती मधील हनुमान मंदिरामध्ये महाआरतीनंतर दुपारी दोन वाजता Akshata Kalash अक्षत कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विश्व मांगल्य सभा, रास्व संघ, विहिप, बजरंग दल, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि सर्व हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.