नवी दिल्ली,
economic growth rate पुढील आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाटचाल करणार असून, भारताचा आर्थिक विकास दर economic growth rate ६.२ टक्के कींवा त्यापेक्षा जास्त राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
economic growth rate मजबूत देशांतर्गत मागणी तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मजबूत वाढ या आधारावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युनोच्या वल्र्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अॅण्ड प्रॉस्पेक्टचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील वेगवान वाढीमुळे दक्षिण आशियातील सकल देशांतर्गत उत्पादन २०२४ मध्ये ५.२ टक्के अशा दराने वाढेल. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारत सर्वांत वेगाने विकसित होत आहे. भारताचा जीडीपी ६.२ टक्के असण्याचा अंदाज आहे, जो २०२३ च्या अंदाजापेक्षा थोडा कमी आहे. अहवालानुसार, २०२५ मध्ये जीडीपी ६.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे.