सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी: आ. चंद्रिकापुरे

    दिनांक :06-Jan-2024
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
Savitribai Phule Jayanti : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी कष्ट सोसून स्त्रियांना शिक्षणाचे दार उघडून दिले. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. ही सर्व किमया केवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच घडली. सावित्रीबाईं फुले यांनी महिलांना शिक्षित केले. आज महिलांनी उमेद व ग्रामसंघ तथा बचत गटाच्या माध्यमातून मोठी प्रगती केली आहे. ही सर्व किमया केवळ सावित्रीबाई फुले मुळेच घडली. महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकृत करून सर्वत्र प्रगती करावी. सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायीच आहेत, असे विचार आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
 
savitribai fule jaynti
 
 
तालुक्यातील सावरटोला/बोरटोला येथे संकल्प समृद्धी ग्रामसंघाच्या महिला मंडळाने आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार चंद्रिकापुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिप सदस्य रचना गहाणे होत्या. अतिथी म्हणून सरपंच युवराज तरोणे, उपसरपंच सुवर्णा तरोणे, ग्रामपंचायत सदस्य डॅनी डोये, धर्मेंद्र गजबे, दिलीप मेश्राम, उर्मिला शिवणकर, कविता चचाने, सीमा शेंडे, शंकर तरोणे, योगेश लाडे, वामन राऊत, महादेव डोये, राजेंद्र तरोणे, पांडूरंग भोपे, राधेश्याम तरोणे, नरेश खोब्रागडे, सुरेंद्रकुमार ठवरे, प्रशांत लाडे तसेच बचत गटाच्या महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी रचना गहाणे म्हणाल्या, महिला आता अबला राहिल्या नसून सबला झाल्या आहेत.
 
सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी फार मोठी प्रगती केली आहे. सर्वच क्षेत्रात महिला अग्रसेर आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसायिक प्रगती करावी व आपले कुटुंब सक्षम करण्याचे आवाहन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून सावरटोला येथे आदिवासी उपाययोजनेअंतर्गत 25 लाख निधीतून तयार होणार्‍या सभागृह व तांडावस्ती योजनेअंतर्गत सिमेंट नाली बांधकाम बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सरपंच युवराज तरोणे यांनी मांडले. संचालन आशा सेविका निशाताई शिवणकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.