२० ते २६ जानेवारीपर्यंत मुसलमानांनी घरातच रहावे !

badruddin ajmal-ayodhya बदरूद्दीन अजमल यांचे वादग्रस्त वक्तव्य

    दिनांक :06-Jan-2024
Total Views |
नवी दिल्ली,
 
badruddin ajmal-ayodhya राम मंदीरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असताना, रामभक्तांना २२ जानेवारीचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, अयोध्येतील राम मंदीरातील प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने राजकारणाला ऊत आला असून, विविध नेत्यांची बेलगाम वक्तव्ये सुरूच आहेत. badruddin ajmal-ayodhya ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट अर्थात एआययुडीएफचे AIUDF प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी भलतेच वक्तव्य करून, वैचारीक दिवाळखोरी दाखवून दिली. badruddin ajmal-ayodhya त्यांचे हे वक्तव्य सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाले असून, देशातील शांतता आणि परस्पर विश्वास बिघडविण्याचे काम अशा वक्तव्यांतून होणार आहे, हे नक्की !
 
 

badruddin ajmal-ayodhya 
 
 
खासदार बदरुद्दीन अजमल यांनी मुसलमान बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी २० ते २६ जानेवारी शक्यतो घराबाहेर पडू नये. या दरम्यान, प्रवास करणेही त्यांनी टाळावे. badruddin ajmal-ayodhya ‘भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मुसलमानांचा द्वेष आहे आणि त्या द्वेषामुळेच ते मुसलमानांच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलतील. म्हणून आपापल्या घरात रहा आणि सुरक्षित रहा,' असे आवाहन त्यांनी केले. आसामच्या ग्वालपाडा जिल्ह्यातील कदमतल गावात एका मदरशाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. २२ जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा असून, त्यादिवशी मुसलमानांच्या विरोधात भाजपा काहीही करू शकते, असे वक्तव्य करून समाजात दहशत निर्माण करण्याचे काम बदरूद्दीन यांनी केले आहे. badruddin ajmal-ayodhya भाजपाचे मोठे षडयंत्र असून, तो पक्ष आपल्या मशिदींचा, आपल्या धर्माचा आणि आपल्या जीवाचा शत्रू आहे. हा पक्ष आपल्या कामाचा नाही, अशी कोटीही त्यांनी केली आहे.
 
 
 
त्यांच्या या विवादास्पद विधानावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिले. ‘भाजपा हा सर्वसमावेशक पक्ष असून, सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर पक्षाचा विश्वास आहे. अजमल यांना भाजपाचा राग येतो. पण, भाजपाला मुसलमानांचा द्वेष नाही आणि सामान्य मुस्लिम बांधवांनाही भाजपाचा द्वेष नाही. badruddin ajmal-ayodhya अजमल मुसलमानांना धमकावत आहेत. पण, इक्बाल अंसारीदेखील राम मंदीराच्या कार्यक्रमात जाणार आहेत आणि ते तिथे पूजा देखील करणार आहेत. मग, कुठले मुसलमान भाजपाला घाबरत आहेत? आता तर या ओवैसी आणि अजमलचे म्हणणे मुसलमानसुद्धा ऐकत नाहीत,' असे म्हणून सिंह यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.