मुंबई :
south film जबरदस्त कथानक, निर्मिती, अभिनय, परिश्रम या बाबींमध्ये दक्षिणेकडील चित्रपटक्षेत्र पहिल्या क्रमांकावर आहे. south film अगदी बॉलिवूड आणि हॉलीवूडच्या धर्तीवर तेलुगू, तमिळ, मल्यायम्, कन्नड चित्रपट तयार होत आहे. या अनुषंगाने थंडेलची निर्मिती करण्यात येत आहे.
south film थंडेलचे टीझर काही दिवसांआधी प्रसिद्ध केले असून, यात नागा चैतन्य नागा चैतन्य भारतीय समुद्र सीमा पार करून पाकिस्तानात पोहोचतो. त्या सरकारकडून त्याला शिक्षा सुनावण्यात येते. लाहोर तुरुंगात शिक्षा भोगताना तो आत्मविश्वास गमावत नाही. पाकिस्तानी अधिकारी भारताबाबत चुकीच्या पद्धतीने भाष्य करतात, त्यावेळी नागा चैतन्य पाकिस्तान म्हणजे भारतातून बाहेर पडलेला तुकडा आहे, असे निक्षून सांगत भारत माता की जय अशा घोषणा देतो. चित्रपटात साई पल्लवीची भूमिका अंतिम टप्प्यात सुरू होते. ती चैतन्य पाकिस्तानातून कधी परतणार याकडे डोळे लावून असते. south film निर्मिती बनी वास यांची, तर दिग्दर्शन चंदू मोंडेती यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता देवी देवी श्री प्रसादने संगीत दिले आहे. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी शामदत्तने संभाळली आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.