केदारांच्या एक्झीटने लोकसभेत कोणाची एन्ट्री?

07 Jan 2024 19:36:13
फिरता फिरता
- प्रफुल्ल व्यास
 
वर्धा,
Sunil Kedar : लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक दुसर्‍या क्रमांकाचे मत काँग्रेसच्या उमेदवाराला मिळवून देणार्‍या, वसंत साठे सारख्या नवख्या उमेदवाराला पंतप्रधानपदाच्या पायरीवर चढवणार्‍या वर्धा लोकसभा मतदार संघात काँग्रेसची परिस्थिती फारच केविलवाणी झाली आहे. कार्यकर्त्यांपैकी एकही उमेदवार होण्याचा उंचीचा नसल्याने या मतदार संघात माजी पालकमंत्री सुनील केदार Sunil Kedar यांनी बस्तान मांडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु, त्यांना शिक्षा झाल्याने आता उमेदवारी कोणाला यावरच काँग्रेसला विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.
 
Sunil Kedar
 
वर्धा जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसची उंची शिखरावर होती. येथे कोणीही उभे करा तो निवडून येईल एवढा आत्मविश्‍वास काँग्रेसजणांमध्ये होता. परंतु, तोच आत्मविश्‍वास त्यांना नडला. भाजपाने केलेली बांधणी काँग्रेसचा बालेकिल्ला भेदक ठरली आणि काँग्रेसला आपल्या हक्काच्या मतदार संघात बाहेरच्या उमेदवारावर विसंबून रहाण्याची वेळ आली होती. आघाडीच्या काळात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सुनील केदार Sunil Kedar यांनी लोकसभेसाठी बांधणी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी कायम आम्ही राजकारणासोबत नसल्याचे वरपांगी दाखवणार्‍या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला ‘हाता’शी धरून राजकारण सुरू केले होते. केदारांचा काँग्रेसमधील वरचष्मा लक्षात घेता येथे आता केदारच लोकसभेचे उमेदवार असा वारा वाहू लागला होता. परंतु, नागपूर जिल्हा म×ध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याच्या आरोपात केदारांना शिक्षा झाली आणि ती ‘हवा’ कारागृहाकडे वळती झाली.
 
 
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या पत्रात इच्छूक उमेदवारांची नावं 10 जानेवारीपर्यंत कळवण्याचे पत्र जिल्हा काँग्रेस कमेटीकडे धडकल्याने काँग्रेसही इलेक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले. वर्धा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी ऑक्सिजनवरच असल्याने या मतदार संघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत अपेक्षित आहे. Sunil Kedar आघाडीने यापूर्वीच जिल्ह्याबाहेरील नेत्यात इंट्रेस नसल्याचे स्पष्ट केले. प्रभा राव यांच्या कन्या अ‍ॅड. चारूलता राव (टोकस) या माहेरवासीनीने अद्याप पत्ते उघडले नाहीत. अमर काळे आणि रणजित कांबळे आपल्या विधानसभा मतदार संघाच्या बाहेर जाण्यास तयार नाहीत आणि त्यांनी आपल्याच मतदार संघाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान, एकच मिशन शेतकरी आरक्षण हा नारा घेऊन राजकारणाची पायरी चढलेले.
 
 
‘हाडा’चा शेतकरी नेता शैलेश अग्रवाल यांनी मात्र काँग्रेसकडून लढण्याची मानसिकता तयार केली आहे. गेेल्या निवडणुकीत सुरुवातीला त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. Sunil Kedar मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याने बसपावर निवडणूक लढवत इन्व्हेस्टमेंट केली. आता मात्र त्यांनी या लोकसभेवर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा दंड थोपटून आहे.
Powered By Sangraha 9.0