विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशाची

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

    दिनांक :08-Jan-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Bharat Sankalp Yatra विकसित भारत संकल्प यात्रा ही केवळ सरकारची नसून, संपूर्ण देशाची आहे. Bharat Sankalp Yatra गरीब, शेतकरी, महिला आणि युवा वर्ग शक्तिशाली होईल, तेव्हाच आपला देश सामर्थ्यवान बनेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोमवारी केले.
 
 
bharat
 
Bharat Sankalp Yatra देशभरातील विविध भागांमध्ये या यात्रेला आभासी माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांच्या काळात कृषी धोरणावरील चर्चेची व्याप्ती केवळ उत्पादन आणि विक्री एवढ्यापुरतीच मर्यादित होती. शेतकऱ्यांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. आमच्या सरकारने या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. Bharat Sankalp Yatra पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला किमान ३० हजार रुपये देण्याचा, कृषी क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा तसच अन्न प्रक्रिया उद्योगला प्रोत्साहन देऊन साठ्यांची सुविधा वाढविण्याचा आमच्या सरकारचा विचार असून, यावर प्राधान्याने चर्चा केली जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
 
Bharat Sankalp Yatra तूर उत्पादक आता त्यांचे उत्पादन आता थेट सरकारला ऑनलाईन माध्यमातून विकू शकतात. त्यांच्या पिकाला योग्य हमी भाव तर दिला जातोच, शिवाय बाजारापेक्षा जास्त किंमतही मिळत आहे. ही योजना आता अन्य डाळींसाठी विस्तारित केली जाणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थींशी संवाद साधला. या यात्रेला अलिकडेच ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या यात्रेच्या काळात ११ कोटी नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे मोदी यांनी सांगितले.