मालदीवला लोटांगण घालायला भाग पाडले!

Maldives-Narendra Modi वाह्यात मंत्र्यांचा समाचार

    दिनांक :08-Jan-2024
Total Views |
अग्रलेख
Maldives-Narendra Modi भारत देश आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाèया मालदीवला खडसावल्यानंतर मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांना निलंबित करण्याचा निर्णय त्या देशाला घ्यावा लागला, ही बाब भारताची जगात वाढलेली ताकद अधोरेखित करते. Maldives-Narendra Modi पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर, भारतीयांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी येण्याचे आवाहन केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताबाबत आणि पंतप्रधान मोदींबाबत जे अनुदार उद्गार काढलेत, त्यामुळे भारतीय जनमानस संतप्त झाले आहे. समाज माध्यमांवर भारतीय नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. Maldives-Narendra Modi भारतातून आलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेत मालदीवच्या राष्ट्रपतींनी आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले असले, तरी भारतीयांचा संताप कमी झालेला नाही. मालदीवला धडा शिकविण्यासाठी भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव' हा ट्रेंड सेट केला आहे. त्याचा जबरदस्त परिणाम पाहायला मिळत असून असंख्य भारतीय पर्यटकांनी त्यांचा मालदीवचा दौरा रद्द केला आहे. Maldives-Narendra Modi याचा मोठा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. कारण मालदीवची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे.
 
 
Maldives-Narendra Modi
 
Maldives-Narendra Modi मालदीवच्या जीडीपीच्या १८ ते २० टक्के हिस्सा हा फक्त आणि फक्त पर्यटन उद्योगाचा आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे अडीच लाख भारतीय पर्यटक मालदीवला भेट देतात, तिथे राहतात, मोठ्या प्रमाणात खर्च करतात. त्यामुळे जर का भारतीयांनी ठरविले तर मालदीवचे कंबरडे मोडणे अशक्य नाही. भारतीयांनी समाज माध्यमाद्वारे मालदीववर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यापासून विमानांची अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. तिथल्या हॉटेलांचे बुकिंगही रद्द होत आहे. त्यातच देशातल्या ज्या टूरिस्ट कंपन्या आहेत, त्या लक्षद्वीपला भेट देण्यावर जोर देत आहेत. Maldives-Narendra Modi मोठ्या प्रमाणात डिस्काऊंटची ऑफरही देत आहेत. भारतातील उत्कृष्ट पर्यटन स्थळ असणाऱ्या लक्षद्वीपला भेट द्या, तिथल्या समुद्र किनाऱ्यांवर येऊन पर्यटनाचा आनंद घ्या, असे आवाहन भारतीय नागरिकांना करण्याचा नैतिक अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहेच. तो कुणीही नाकारू शकत नाही. असे असताना मालदीवच्या मंत्र्यांनी चोंबडेपणा करण्याचे काही कारण नव्हते. पण, त्यांनी कारण नसताना हस्तक्षेप केला. मोदी आणि भारताविरुद्ध अवमानजनक टिप्पणी केली. Maldives-Narendra Modi याला भारताने आक्षेप घेतला नसता आणि भारतीयांनी संताप व्यक्त केला नसता तरच नवल. भारतीयांनी यावेळी देशहिताला प्राधान्य दिले.
 
 
सरकार कुणाचे आहे याचा विचार न करता भारतीय नागरिकांनी मालदीवला खडे बोल सुनावले हे चांगलेच झाले. जेव्हा केव्हा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर षडयंत्र रचले जाते, तेव्हा पक्षभेद विसरून सगळ्यांनी एकजूट झालेच पाहिजे. ही काळाची गरज आहे. एका अर्थाने बरेच झाले मालदीवच्या मंत्र्यांना भारतावर टीका करण्याची दुर्बुद्धी झाली. Maldives-Narendra Modi आपल्या देशातील पर्यटक विदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. त्यामुळे तिकडच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळते. त्यामुळे आपला पैसा आपल्याच देशात राहिला तर आपल्या अर्थव्यवस्थेला ताकद मिळेल आणि आपला देश आर्थिक सुस्थितीत येईल. जे काही घडले आहे ते दुर्दैवी असले, तरी भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वरदानच ठरणार आहे, हे निश्चित! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली, समुद्र किनारी निवांत क्षण घालवले आणि तिथल्या फेरफटक्याची छायाचित्रे प्रसृत केली, हे एका अर्थाने बरे झाले. Maldives-Narendra Modi आता लक्षद्वीपचे महत्त्व वाढले आहे. पर्यटक आता लक्षद्वीपसाठी बुकिंग करायला लागले आहेत. याच्या परिणामी लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, तिथे हॉटेल उद्योगाची प्रगती होईल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि सरतेशेवटी अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊन आपले जे पाच ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य आहे, ते साध्य करण्यात यश मिळेल.
 
 
Maldives-Narendra Modi मालदीवला यापुढे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. कारण त्यांच्या मंत्र्यांनी भारताचा अपमान केल्यापासून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या एकदमच रोडावली आहे. मालदीवला जायचे आहे, तिथे जाण्यासाठी किती पैसे लागतील, अशी चौकशी टूरिस्ट कंपन्यांकडे करणाऱ्या पर्यटकांची संख्याही प्रचंड कमी झाली आहे. मंत्र्यांनी केलेल्या टिप्पणीचा मालदीवच्या राष्ट्रपतींनी निषेध केला, हाही भारताच्या वाढलेल्या प्रभावाचा परिणाम आहे. Maldives-Narendra Modi भारत हा आमचा जुना मित्र आहे, असे त्यांना सांगावे लागणे हीसुद्धा भारताची वाढलेली ताकदच अधोरेखित करते. मंत्र्यांच्या अनुदार उद्गारांमुळे भारताशी असलेल्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होणार नाही, असे बोलणेही त्यांना भाग पडले, हेही बरेच झाले. मालदीवला भारतापुढे अक्षरश: लोटांगण घालावे लागले. Maldives-Narendra Modi प्रारंभी हात झटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालदीवला नंतर स्वत:ची चूक आणि भारताच्या ताकदीचा अंदाज आला आणि विनाविलंब त्यांनी मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई केली, हा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचा परिणाम मानला पाहिजे. मालदीवच्या मंत्र्यांनी भारतासारख्या अत्यंत प्रभावशाली देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे मत सत्ताधारी मालदीव नॅशनल पार्टीच्या प्रवक्त्याने व्यक्त केले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, मालदीव सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
 
 
बॉलिवूडमधील सिनेनट आणि नट्या दरवर्षी सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदीवला जात असतात. Maldives-Narendra Modi त्यांच्या माध्यमातून मालदीव सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमावता येते. ही बाब लक्षात घेता बॉलिवूडने एकमुखाने मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना जी एकजूट दाखविली, ती प्रशंसनीय आहे. राजकीय मतभेद आणि लोकशाहीत बोलण्याचे स्वातंत्र्य असल्याने आम्ही भलेही आमच्या सरकारवर टीका करू, पण तो अधिकार आम्ही देशाबाहेरील लोकांना दिलेला नाही, याची जाणीव बॉलिवूडनेही मालदीवला प्रकर्षाने करून दिली, हा भारतीय राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने चांगला संकेत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही मालदीवला खडे बोल सुनावले आहेत. Maldives-Narendra Modi क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपल्या शैलीने मालदीवच्या वाह्यात मंत्र्यांचा समाचार घेतला आहे. जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेने घडते, असेच मानले पाहिजे. भारतापुुढे जेव्हाही संकट उभे ठाकते, तेव्हा त्याचे संधीत रूपांतर करण्याची संधी मोदींसारखा द्रष्टा नेता सोडत नाही, हे गेल्या साडेनऊ वर्षांच्या काळात आपण अनुभवलेच आहे. आपल्या देशात अशी अनेक अज्ञात पर्यटन स्थळे आहेत, ज्यांची माहिती आपल्यालाच नाही.
 
 
Maldives-Narendra Modi आपला देश या धरतीवरील नितांत सुंदर असा देश आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. आपल्या देशातल्या सौंदर्याचा आनंद लुटल्यानंतरच आपण विदेशात जाण्याचा विचार केला पाहिजे. आपल्या देशात उंचच उंच पर्वत शिखरे आहेत, मोठमोठ्या आणि लांबच लांब नद्या आहेत, जम्मू-काश्मीरसारखे नंदनवन आहे, ७५१६ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, असंख्य अशा चौपाट्या आहेत, अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. Maldives-Narendra Modi या सगळ्यांना भेट देता देता एक जन्म निश्चितच संपून जाईल. त्यामुळे मालदीवसारख्या छटाकभर देशांना भेटी देऊन आपली विदेशी गंगाजळी संपविण्यापेक्षा आपल्याच देशातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन असलेल्या गंगाजळीत वाढ करून मोदींच्या स्वप्नातली पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साकार करण्याचा निर्धार केला पाहिजे. आता संधी उपलब्ध झाली आहे. सरकारच्या पातळीवर मालदीवचा समाचार घेतला जाईलच. Maldives-Narendra Modi पण, देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक या नात्याने आपणही जागरूक राहात आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढविण्यासोबतच वाकडी नजर करून पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे बळ आपल्या सरकारला दिले पाहिजे.