विकसित भारताच्या दिशेने...!

09 Jan 2024 17:32:02
अग्रलेख
developed India-Modi आपण काल जसे होतो किंवा आज जसे आहोत, तसे आपण उद्या असणार नाही... आपले किमान एक पाऊल तरी पुढे गेलेले असले पाहिजे आणि आज-कालपेक्षा आपण सरस असलो पाहिजे, ही भावना विकास नावाच्या संकल्पनेच्या पायाशी असते. developed India-Modi भारत स्वातंत्र्यानंतर दीर्घ काळ अविकसित देशांच्या यादीत होता. आता तो विकसनशील देशांच्या यादीत आलेला आहे... आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या देशाला विकसित राष्ट्र बनण्याचे स्वप्न दिले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणाले की, ही यात्रा केवळ सरकारची नव्हे. ही संपूर्ण देशाची यात्रा आहे. त्यांचे म्हणणे खरेच आहे. developed India-Modi त्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणा आणि लोकांवर सोपविली आहे. विकसित भारत संकल्प यात्रा हे एक स्वप्न आहे. तो एक संकल्प आहे. एखादी गोष्ट निर्धारपूर्वक केली जाते तेव्हाच संकल्प सिद्धीस जात असतात. स्वप्ने आणि संकल्प आपल्याला दिशा आणि उद्देश या दोन्ही गोष्टी देतात. developed India-Modi आपल्याला कुठे जायचे आहे आणि काय साध्य करायचे आहे, याची स्पष्ट दिशा संकल्पांमधून मिळते.
 
 
 
developed India-Modi
 
 
भारत एकेकाळी पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यवीरांनी विदेशी राजवटीपासून मुक्ततेचे स्वप्न पाहिले, त्यासाठी लढा दिला, बलिदान दिले आणि देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर पहिला प्रश्न होता तो भुकेचा. developed India-Modi तो हाताळण्यासाठी आपल्या तत्कालीन नेत्यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. स्वप्न आण्विक शक्ती प्राप्त करण्याचे असो, अवकाशात उपग्रह सोडण्याचे असो वा देशभरात अत्याधुनिक महामार्गांचे जाळे विणण्याचे असो, ते कुठल्या तरी टप्प्यावर द्रष्ट्या लोकांकडून पाहिले गेले आणि मग ते प्रत्यक्षात आले. विकसित भारत हे असेच एक स्वप्न आहे. developed India-Modi विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषदा, महापालिका यांच्यापर्यंत पोहोचून शासनाच्या योजना अधिकाधिक प्रमाणात लागू व्हाव्यात, असा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. आतापर्यंत ज्यांना पात्र असूनही योजनेचा लाभ मिळाला नाही अशा लोकांपर्यंत पोहोचणे, शासकीय योजनांबद्दल माहिती देणे व जागृती निर्माण करणे, लोकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणे आणि भविष्यातील लाभार्थींच्या नोंदी घेणे, या उद्देशाने ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.
 
 
developed India-Modi यातून अधिकाधिक लोक शासकीय योजनांचा लाभ घेतील, आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होतील आणि अंतिमतः विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, अशी ही दृष्टी. अर्थात, केवळ सरकारी योजनांनी देश विकसित होत नसतो, हे खरे आहे. मात्र, ज्यांना योजनांच्या आधाराची गरज आहे, अशांना तो प्राधान्यक्रमाने दिला पाहिजे, असा प्रयत्न होत असेल तर ते चांगलेच आहे. भारत हा एक खंडप्राय देश आहे. प्रचंड आकाराचा भूगोल आणि अद्भुत प्रकारांचे वैविध्य असलेले हे राष्ट्र कृषिप्रधान आहे. developed India-Modi अशा देशात औद्योगिकीकरण घडवून आणणे आणि त्याद्वारे दरडोई उत्पन्न वाढविणे सोपे नसते. तरीही ते गेल्या काही दशकांमध्ये औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आणि प्रचंड रोजगार निर्मिती झाली. विकसित देशाच्या संदर्भात विचार केला जातो तेव्हा त्याचे सर्वमान्य मापदंड नाहीत. मात्र, सर्वांत आधी व प्रामुख्याने औद्योगिकतेचा आणि त्याला धरून दरडोई उत्पन्नाचा विचार होतो. त्यासाठी गरज असते विज्ञान आणि तंत्रज्ञानाची. प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औद्योगिकीकरणाचा मार्ग प्रशस्त करता येतो. नैसर्गिक संसाधने ही कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया असतात. developed India-Modi पुरेशी नैसर्गिक संसाधने ही राष्ट्राच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असते.
 
 
जपान आणि इंग्लंडने मोठ्या प्रमाणात कच्चा माल आयात करून आणि केवळ विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वेगाने विकास केला. सर्व विकसित राष्ट्रांनी नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे उभारले आहेत. ब्रिटन, अमेरिका, जपान, जर्मनी इत्यादी देशांनी औद्योगिकीकरणाकडे विशेष लक्ष दिले. developed India-Modi या देशांमध्ये लोह-पोलाद उद्योग, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, मोटार वाहन निर्मिती उद्योग, जहाज आणि विमान निर्मिती उद्योग इत्यादींचा वेगाने विकास झाला. याशिवाय, शेतीकडेही त्यांनी वेगळ्या प्रकारे लक्ष दिले. विकसित देशांनी उद्योगांसाठी शेतीतून कच्चा माल मिळवण्यासाठी शेतीमध्ये यंत्रांचा वापर सुरू केला आहे. मशिनच्या साह्याने शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे विकसित देशांमध्ये प्रगतीची दारे खुली झाली आहेत. अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड इत्यादी विकसित देशांमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. developed India-Modi या देशांमध्ये यंत्रांच्या साहाय्याने व्यावसायिक शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि कृषी उत्पादनाचा मोठा भाग निर्यात केला जातो.
 
 
प्रगत- शास्त्रीय व यांत्रिक शेती, महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फळे-भाजी पुरविणाèया व्यावसायिक बागा, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाचा प्रगत स्तरावर विकास, विकसित वाहतूक आणि दळणवळण प्रणाली, मोठे उद्योग व उत्पादन, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर, निर्यातीचे अधिक प्रमाण आणि या सर्वांतून उच्च दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न असे हे चक्र फिरत असते. developed India-Modi यामुळे या देशांतील रहिवाशांचे जीवनमान उंचावले आहे. विकसित देशांमध्ये स्त्रिया शिक्षित आणि रोजगारात गुंतलेल्या आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. शिक्षण, आरोग्याच्या सोयी उत्तम आहेत. बहुतांशी लोकांचे आरोग्य चांगले आहे. या साèयांच्या तुलनेत भारताचा बराच विकास व्हायचा असला तरी आपण मोठी प्रगती केली आहे, हे खरे. भारताचे दरडोई उत्पन्न विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. लक्षणीय आर्थिक वाढ झाली असली तरी उत्पन्नाचे वितरण असमान आहे आणि लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही गरिबीत जीवन कंठतो आहे. दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यात भारतासमोर आव्हाने आहेत. developed India-Modi शहरी आणि ग्रामीण भागात विकासाचे मोठे अंतर आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे वायू आणि जल प्रदूषणासह पर्यावरणीय आव्हाने निर्माण झाली आहेत.
 
 
या सर्व आव्हानांना तोंड देत असतानाच आपल्याला आपली वाटचाल सुरू ठेवायची आहे. विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे अशा वाटचालीची प्रेरणा. तिचा सांगावा असा की, मर्यादा आहेत, अडचणी आहेत, आव्हाने आहेत, पण आपल्याला पुढे जायचे आहे. अधिकाधिक लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. प्रत्येकाची भूक भागणे, डोक्यावर छत असणे आणि निर्भयपणे व सन्मानाने जगता येणे याच गोष्टी सामान्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. developed India-Modi त्यासाठी देखील भारताला बरेच प्रयत्न करावे लागतील, हे खरे आहे. ही यात्रा त्याचाच भाग होय. मोदी सरकारने गेल्या दशकभरात जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या योजना आणल्या. त्यातही गरीब, शेतकरी, महिला आणि युवक अशा चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे भारतात स्टार्टअप्सचे युग अवतरले तर दुसरीकडे कृषी क्षेत्राच्या विकासाला बळ मिळाले. अडचणी असल्या म्हणून थांबायचे नसते. चालत राहिले की अडचणी आपसूक बाजूला होतात किंवा मागे पडतात. developed India-Modi गेल्या दशकभराच्या कालखंडात साऱ्या देशाने याचा अनुभव घेतला आहे आणि विकसित भारत संकल्प यात्रेतून नव्या भारताचे स्वप्न सिद्ध होण्याच्या दिशेने पुढचे पाऊल पडणार आहे, हे निश्चित.
Powered By Sangraha 9.0