ठिय्या आंदोलन दोन्ही मागण्यांची पुर्तता

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
सेलू, 
Thiyya Movement : स्थानिक विद्युत वितरण कार्यालयात किसान अधिकार अभियानच्या माध्यमातून तालुक्यातील ओलिताखालील शेतकर्‍यांना विद्युत पुरवठा संबंधाने येणार्‍या अडचणींसाठी बेमुदत शेतकरी ठिय्या आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपविभागीय विद्युत वितरण कंपनी कार्यालयात जमा झाले होते. किसान अधिकार अभियानाच्या आक्रमकपणामुळे दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्याचे किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे यांनी कळवले आहे.
 
 
THIYYA
 
 
आंदोलनातून शेतीसाठी ग्रामीण भागात पूर्णवेळ विद्युत पुरवठा द्यावा, निवासी वायरमन ची व्यवस्था गावात करावी. या दोन्ही मागण्यासाठी विद्युत कार्यालात सहाय्यक अभियंता सिरपुरकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. निर्णय होईपर्यत ठिय्या आंदोलन कायम करण्याचा निर्धार सांगितला.
 
 
सहाय्यक अभियंता शिरपुरकर यांनी दुरध्वनीवरून आंदोलनाची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर काहीच वेळात दोन्ही मागण्या मान्य केल्या. पुढील चार दिवसात तालुक्यातील शेतकर्‍यांना पुर्णवेळ विद्युत पुरवठा व पुर्णवेळ वायरमन उपलब्ध होईल. किसान अधिकार अभियानच्या ठिय्या आंदोलनामुळे शेतकर्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला.
 
 
यावेळी आंदोलनात मुख्यप्रेरक अविनाश काकडे, अध्यक्ष सुदाम पवार, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे, विठ्ठल झाडे, गोपाल दुधाने, प्रफुल कुकडे, प्रा. प्रवीण भोयर, चंद्रकांत ढगे, उमेश नरांजे, शैलेश तेलरांधे, गणेश सुरकार, अनिल राऊत, आदी कार्यकर्ता व शेतकर्‍यांची उपस्थिती होती.