विभागात ३५ हजार हेक्टरवर बांबू लागवड

-मनरेगा मिशन मोडवर -हरित महाराष्ट्र राबविणे सुरू

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |
नागपूर,
bamboo plantation : मनरेगांतर्गत राज्यात चालू आर्थिक वर्षात १.१४ लाख हेक्टर बांबू लागवडीच्या उद्दिष्टासह येत्या ५ वर्षात एकूण ११ लाख हेक्टर जमीनीवर बांबू लागवड करण्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच नागपूर विभागात चालू आर्थिक वर्षात ठेवण्यात आलेल्या ३५ हजार १०० हेक्टरवरीलबांबू लागवडीचा जिल्हा निहाय आढावा महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी आज नागपुरात घेतला.
 
 
baithak
 
 
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘हरित महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृद्धीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविण्याबाबत वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पर्यावरण व वातावरणीय बदल सेलचे संचालक अभिजीत घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील व पर्यावरण, आदिवासी विकास , महसूल, जलसंधारण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा) प्रभावी अंमलबजावणीद्वारे नागपूर विभागात qसचित बांबू, फळझाडे व इतर झाडे, फूलपीके, तूती आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसह कुरण विकास आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही नंदकुमार वर्मा यांनी आज संबंधीत यंत्रणांना दिले.
 
 
मनरेगा अंतर्गत कामे गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादक होण्यासाठी टिकाऊ व उत्पादकत्ता तयार करुन बांबू तसेच इतर हरित आच्छादित पीक qसचीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बैठकीत अभिजीत घोरपडे यांनी हवामान बदलाच्या जागतिक स्तरावरील आवाहनाविषयी मार्गदर्शन करतांना जागतिक स्तरावरील भारतात व महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचे दाखले दिले.