डॉ. हेडगेवार : विराट संघस्वरूपाची प्रेरणा

11 Oct 2024 19:02:29
दृष्टिक्षेप
Dr. Hedgewar : आज जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी  घातला. संघ समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणालाही संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनाशी असणे आवश्यक आहे. त्यांना लोक प्रेम व आदराने ‘डॉक्टरजी’ म्हणून संबोधित असत. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली तेव्हा ते ३६ वर्षांचे होते. त्यांना स्वत: राजकारणी बनण्याची इच्छा नव्हती. कारण जर त्यांना राजकारणी व्हायचे असते तर आपल्या व्यक्तिगत अडचणी असूनही त्यांनी एखाद्या राजकी पक्षाची स्थापना केली असती, परंतु हे ध्येय नव्हते.
 
 
RSS-7
 
ब्रिटीशांच्या गुलामगिरीत भारतीय संस्कृती नष्ट होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय झाला. ्रिटिशांच्या राजवटीमुळे व्यथित होऊन डॉ. केशव ळीराम हेडगेवारयानी राष्ट्री स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांच्यात समाजसेवा आणि देशभक्ती ठासून भरलेली होती. बालपणी त्यांनी मुलांसमवेत सीताबर्डी किल्ल्यावरून ब्रिटिशांचा  युनियन जॅक ध्वज खाली उतरवण्यासाठी बोगदा तयार करण्याची आखली होती. यातून त्यांच्या राष्ट्री भावनेचा परिपोष दिसून येतो.
 
 
१९२५ ध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर डॉ. केशव बळीरा हेडगेवार यानी राष्ट्री स्वयंसेवक संघाची स्थापना केली. मार्च २०२४ च्या प्रतिनिधी सभेनुसार - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९२२ जिल्ह्यांमधील ६५९७ खंड आणि २७,७२० मंडळांमध्ये ७३,११७ दैनिक शाखा आहेत. प्रत्येक मंडळात १२ ते १५ गावांचा आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून संघाच्या प्रेरणेने विविध संघटना कार्यरत आहेत, ज्या राष्ट्र उभारणीत आणि हिंदू समाजाला संघटित करण्यात योगदान देत आहेत. संघाच्या विरोधकांनी १९४८, १९७५ आणि १९९२ अशी तीनदा संघटनेवर बंदी घातली. पण तिन्ही वेळा संघ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला. रा. स्व. संघ ही सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे.
 
 
स्वयंसेवक संघ ‘हिंदू’ शब्दाची व्याख ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या संदर्भात करतो. मात्र, संघाची ही सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना पाश्चिमात्यांच्या धार्मिक संकल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. संघाची विचारधारा आणि ध्येयांचा जिवंत संबंध स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, बाळ गंगाधर टिळक आणि बी. सी. पाल यांच्यासारख्या हिंदू विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाशी आहे. ‘एक खर्‍या अर्थाने हिंदू संघटना अत्ंत आवश्यक आहे, जी हिंदूंना परस्पर सहकार्याची आणि समन्वयाची भावना शिकवेल’, असे स्वामी विवेकानंदांना नेहमीच वाटत होते.
 
 
Dr. Hedgewar डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वामी विवेकानंदांचा हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणला. हिंदूंना अशा कृती-तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे, जे इतिहास आणि संस्कृतीवर आधारलेले असेल, जे त्यांच्या भूतकाळाचा भाग आहे आणि ज्याबद्दल त्यांना काही आहे, असे त्यांचे मत होते. राष्ट्री स्वयंसेवक संघाच्या शाखा ‘स्व’ ची भावना परिशुद्ध करून एका मोठ्या सामाजिक आणि राष्ट्रीय हिताच्या भावनेत विलीन होते.
 
 
हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी व हिंदू समाज, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करून राष्ट्राला परम वैभवाकडे नेण्याच्या उद्देशाने डॉक्टरसाहेबांनी संघाची स्थापना केली, असे आपण म्हणू शकतो.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : महान भारताचा संकल्प
रा. स्व. संघ हा राजकीय पक्ष नाही तर एक सामाजिक संघटना आहे. संघाची कोणतीही राजकीय हत्त्वाकांक्षा नाही किंवा कुठल्याही राजकीय फायद्यासाठी तो का करीत नाही. राष्ट्रीय राजकीय जीवनावर संघाचा प्रभाव दिसून येत असला तरीही तो राजकारणापासून दूर राहतो. संघाच्या शाखा पद्धतीत, असे निश्चितपणे तयार झाले आहेत, जे आज राजकारणात उच्च पदांवर आहेत. संघ शाखा चालवण्याव्यतिरिक्त काहीही करणार नाही आणि स्वयंसेवक कोणतेही कार्यक्षेत्र सोडणार नाही, असे संघाचे सर्वसाधारण तत्त्व आहे. स्वयंसेवक शिक्षण, राजकारण, अर्थशास्त्र, संरक्षण, संस्कृती इत्यादी समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. भारताला एक महान राष्ट्र बनवणे, हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकमेव आहे. एक सशक्त हिंदू समाज निर्माण करण्यासाठी संघाला सर्व जातीतील लोकांना एकत्र व संघटित करायचे आहे.
 
 
 
महात्मा गांधींच्या प्रश्नाला डॉ. हेडगेवारांचे उत्तर
गांधीजींचा एक प्रश्न होता की डॉक्टरजींनी आपली संघटना काँग्रेससारख लोकप्रि संस्थेच्या छायेखाली का सुरू केली नाही? काँग्रेसने आर्थिक दत देण्यास नकार दिला होता का? उदारमतवादी लोकांची काँग्रेसमध्ये होती का? यावर डॉक्टरांचे उत्तर होते ‘काँग्रेसचे र्का करीत असताना तिच्या छत्रछायेतच कायमस्वरूपी संघटना स्थापन करण्याचा आपला पहिला प्रयत्न होता. मात्र श मिळाले नाही. प्रश्न केवळ पैशांचा नव्हता. पैशाच्या बळावर सर्व काही करता येत नाही. प्रश्न स्वंसेवक संस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा होता. काँग्रेसमध्ये का करणार्‍या चांगल्या माणसांची संख बरीच होती. त्यांचे सारे लक्ष नेहमीच राजकी उद्दिष्टे साध्य करण्याकडे असते. त्यांची दृष्टी सहसा समकालीन राजकीय हितसंबंधांच्या पलीकडे जातच नाही. स्वयंसेवकांनी आमच्या (राजकीय नेत्यांच्या) कामांसाठी इकडे तिकडे धावले पाहिजे, हाच स्वयंसेवक संस्थेचा उपयोग आहे, असा त्यांचा (काँग्रेसी नेत्यांचा) दृष्टिकोन होता. राष्ट्रासाठी स्वयंप्रेरणेने कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांची निर्तिी करणार्‍या सामर्थ्यशाली संघटनेची स्थापना ही विचारशक्तीच्या पलीकडील बाब आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून देशाच्या नवनिर्मितीची अपेक्षा कशी करता येईल? त्यामुळे संघाची स्थापना आणि संघटना देशाच्या नवनिर्मितीचा एक प्रयत्न आहे. राष्ट्री स्वयंसेवक संघात सर्व समान आहेत. इथे कुठल्याही भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘आदर्शवादी स्वयंसेवक’ ही आमची भूमिका आहे आणि हेच संघाच्या वाढत्या सामर्थ्याचे रहस्य आहे.’’ जर काँग्रेसचे कार्य सुरू आहे तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय आवश्यकता आहे, या प्रश्नाचे उत्तर डॉक्टरजींच्या त्या टिप्पणीत सापडते. विशेष उल्लेखनी गोष्ट म्हणजे म्हणजे ही टिप्पणी त्यांनी संघाच्या स्थापनेच्या पाच वर्षांतच लिहिली आहे.
 
 
Dr. Hedgewar डॉक्टरजी लिहितात, ‘हिंदू संस्कृती हा हिंदुस्थानचा प्राण आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे संरक्षण करायचे असेल तर हिंदू संस्कृतीचे करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते. जर हिंदुस्थानची हिंदू संस्कृतीच नष्ट होणार असेल व त्यामुळे हिंदू समाजाचे अस्तित्वच हिंदुस्थानातून नष्ट होणार असेल, तर उर्वरित जनिीच्या तुकड्याला हिंदुस्थान किंवा हिंदुराष्ट्र कसे म्हणता येईल? कारण राष्ट्र हे जमिनीच्या तुकड्याचे नाव नाही. ही गोष्ट पूर्णपणे सत् आहे. तरीही हिंदू र्ध आणि हिंदू रक्षण आणि दररोज परधर्मीयांकडून हिंदू समाजावर होणार्‍या विध्वंसक आक्रमणाकडे काँग्रेसकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या अत्ंत महत्त्वपूर्ण कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता आहे. तरीही संघ काँग्रेसच्या कदापि विरोधात नाही. आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या मार्गात अडथळा न ठरणार्‍या स्वातंत्र्य चळवळीत संघ काँग्रेसला सहकार्य करेल आणि आजपर्यंत करतही आला आहे.’’
 
 
भारताचा स्वातंत्र्यलढा 
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. जी डॉक्टर साहेबांच्या अथक परिश्रमाच्या संदर्भात समजून घेता येऊ शकते. कलकत्ता (कोलकाता) येथे डॉक्टरजींची श्यामसुंदर चक्रवर्ती मौलवी लियाकत हुसैन यांच्याशी घट्ट मैत्री होती. स्वातंत्र् संग्रामातील त्यांचे सहकारी मौलवी लियाकत हुसैन आपल्या आयुष्यात खरे भारतीय होते. स्वदेशी आंदोलनात सक्रिय असताना तुर्की टोपी घालणे कायमचे सोडून दिले होते. त्या दिवसांत रत्नागिरीतील आठले नावाचा एक बॉम्ब निर्माता तरुण कलकत्त्यातील क्रांतिकारकांच्या संपर्कात आला. त्याने कलकत्त्याजवळच्या एका गावात क्रांतिकारकांना ॉम् नवायला शिकवले. डॉ. हेडगेवार यांनी देखील बॉम्ब कसा बनवायचा हे त्याच्याकडून शिकून घेतले. मात्र, त्याच दरम्यान आठले याचे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर डॉ. आणि श्यामसुंदर चक्रवर्ती यांनी गुप्तपणे अन्त्यसंस्कार केले. क्रांतिकारक असतानाच डॉक्टरजींनी कधीही विवाह न करण्याचा संकल्प केला होता.
 
 
संघाचे वरिष्ठ अधिकारी ाबासाहे आपटे सांगत असत की, १९३९ साल संपत आले होते आणि युरोपात दुसरे महायुद्ध सुरू होते. त्या डॉ. हेडगेवारांना रात्रंदिवस एकच चिंता सतावत होती की, महायुद्धाच्या या परिस्थितीत इंग्रजांची भारतातून उखडून टाकण्यासाठी तितकीच प्रभावी आणि शक्तिशाली संघटना स्थापन केली पाहिजे. त्यामुळे जेव्हा कोणीही स्वंसेवक त्यांना ‘‘डॉक्टर साहेब! आपल्या संघटनात्मक कार्यासाठी एका मोठ्या कार्यालयाची आवश्यकता आहे. संघाचे असे कार्यालय नाही. तुम्ही ते बांधण्याचा विचार करा,’’ असे आग्रहपूर्वक म्हणायचा तेव्हा डॉक्टरजी म्हणायचे, ‘अरे आजच्या घडीला संघकार्य वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. तुमची सर्व शक्ती त्यात लावा, नाहीतर तुम्ही जे भव्य कार्यालय बांधाल त्यातच इंग्रज थाटात आपली कचेरी उघडून आरामात बसतील. अर्थातच ब्रिटि  बिट्रिशांची गुलामगिरी डॉक्टरांना कायम सलत होती, हे स्पष्ट दिसते.
 
 
Dr. Hedgewar संघाचे सरकार्यवाह राहिलेले भैयाजी दाणी देखील लिहितात की, इंग्रज सरकारचा आपल्यावर कोप होईल याची मुळीच पर्वा न करता डॉक्टरजींनी त्यांच्या ‘वंदे मातर’चा उद्घोष केला, भलेही यासाठी त्यांना ती शाळा सोडावी लागली.’’
आपल्या क्रांतिकारी जीवनात डॉ. हेडगेवार ांनी स्वत: शस्त्रे वापरली, तीही इतक्या सावधगिरीने की तत्कालीन इंग्रज सरकारला संश येऊनही ते त्यांना पकडू शकले नाहीत. त्यांच्या या सशस्त्र आंदोलनामुळे ब्रिटीश राज्यकर्त्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आणि लोकांमध्ये ब्रिटिश सरकारबद्दल असंतोष झाला. डॉक्टरजींना मातृभूमीचे स्वातंत्र् हवे होते आणि देशाचे स्वातंत्र्य आपल्या जिवंतपणीच पहावे ही त्यांची प्रखर इच्छा होती आणि त्या दिशेने त्यांना निश्चित पावले टाकायची होती. प्रखर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर, त्यांचे थोरले ंधू गणेश दामोदर सावरकर आणि धाकटे बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर, वामनराव जोशी, बॅरिस्टर अभ्यंकर आणि सुभाषचंद्र त्यांचे स्नेही होते. सन १९२२-२३ मध्ये पुलगाव येथे वर्धा तालुका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत स्वराज्याचा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा त्यात अहमदाबाद-काँग्रेसने स्वीकारलेला ‘स्वराज्’ शब्दाचा अर्थ काही लोकांनी ब्रिटिश साम्राज्यातंर्गत स्वराज’ असा केला. पण डॉक्टरजींना हे कदापि मान्य नव्हते. ते बिट्रिश राजवटीपासून पूर्णपणे मुक्त, स्वतंत्र असे स्वराज्य खरे स्वराज्य असे मानत असत. कारण ते प्रखर स्वातंत्र्यवादी होते आणि म्हणून जेव्हा डॉक्टरजींनी परिषदेत स्वराज्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यात त्यांनी बिट्रिश राज्य विरहित स्वराज्य’ अशी दुरुस्ती सुचवली.
 
 
Dr. Hedgewar : डॉ. हेडगेवार आणि संघ हे एकमेकांचे समानार्थी शब्द होते. जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीचे निधन होते, तेव्हा तिच्याशी संबंधित असलेल्या संस्थेला न भरून येणारे नुकसान सहन करावे लागते. संघाबद्दल देखील त्याचे मित्र आणि मत्सराने ग्रासलेले, दोन्ही प्रकारचे लोक असाच विचार करीत होते. पण एका अर्थपूर्ण व उदात्त कार्यासाठी समर्पित असलेल्या या सारथीने संघाला कालजयी केले. म्हणूनच लोकमान् टिळकांनी सुरू केलेल्या ‘मराठा’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर २३ ऑगस्ट १९४० रोजी प्रकाशित झालेल्या बातमीचे शीर्षक होते ‘डॉ. हेडगेवार्स संघ स्टील गोईंग स्ट्राँग.
 
 
काँग्रेसची मुस्लिम तुष्टीकरणाची धोरणे डॉ. हेडगेवारांनी ज्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तो काळ मुस्लिम तुष्टीकरणाचा होता. १९२० मध्ये भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली. मुसलमानांचे नेतृत्व मुल्ला-मौलवींच्या हातात होते. या काळात मुसलमानांनी देशात अनेक दंगली घडवून आणल्या.
 
Dr. Hedgewar : केरळमध्ये मोपला मुसलमानांनी बंड केले. त्यात हजारो हिंदू मारले गेले. मुस्लि आक्रकांच्या हल्ल्यांमुळे हिंदूंमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आम्ही संघटित झाल्याशिवाय मुस्लि आक्रकांपुढे आपला टिकाव लागणार नाही, असा विचार अनेकांनी मांडला. धर्मांध मुस्लिमांचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंचे संघटन उभे राहिले पाहिजे, असे लोकांना तीव्रतेने वाटू लागले. त्यावेळचे नेते मुस्लि समाजाला धर्मांध समजत होते आणि हेच सर्व संघर्षांचे मूळ कारण असल्याने, त्या समाजात शिक्षणाचा प्रसार करणे एक महत्त्वाचा भाग मानत होते. डॉक्टरजींना हे मान्य नव्हते. त्या समाजाची धर्मांधता आणि निरक्षरता त्यांना मान्य होती. पण हे संघर्षाचे मूळ कारण आहे हे त्यांना मान्य नव्हते. कारण त्यांना त्यांच्या नेत्यांमध्ये सापडले, ज्यांच्या मनात त्यांचे पूर्वीचे राज् आणि वैभव परत मिळवण्याची इच्छा ठासून भरलेली होती आणि ज्यांना ब्रिटिशांनी ‘ऐतिहासिक अल्पसंख्क म्हणून त्यांच्यातील फुटीर वृत्तीला चालना दिली होती. काँग्रेसतर्फे चालविण्यात ेत असलेली खिलाफत चळवळ डॉक्टर साहेबांना आवडली नाही. ते त्याला नेहमी ‘अखिल आफत’ असेच म्हणायचे. तेव्हापासून काँग्रेसने धोरण स्वीकारले आणि जमातवादाने भारताच्या राजकारणात प्रवेश केला, जो डॉक्टरजींना अजिबात पसंत नव्हता. शेवटी त्यावेळच्या बड्या नेत्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाचे धोरण का स्वीकारले? याचे पहिले आणि मुख् कारण म्हणजे ब्रिटिश राज्यकर्ते मुस्लिम जमातवादाला ‘हिस्टोरिकल मायनॉरिटी’ अर्थात ऐतिहासिक अल्पसंख्क संबोधून प्रोत्साहन देत होते आणि त्यांना राजकी क्षेत्रात अधिकाधिक सोयीसुविधा देऊन त्यांना वेगळेही करीत होते. डॉक्टरजींचा हिंदू समाजाच्या वीर वृत्तीवर पूर्ण विश्वास होता. ते हिंदूंना भित्रे मानायला तयार नव्हते. त्यांची प्राचीन परंपरा व जीवनातील ध्येयावर पूर्ण निष्ठा होती. हिंदू समाजाला आपल्या परंपरांचा विसर पडला आहे, हा मुद्दा त्यांना मान्य होता. इंग्रजांनी जातिव्यवस्थेच्या जागी जातिभेद हा शब्द वापरून जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला. येथील समाज छोट्या-छोट्या भागात विभागला गेला आणि आपापसात संघर्षही झाला. याच कारणामुळे विशाल समाज स्वत:ला कमकुवत समजू लागला व त्यामुळेच तो इतर समाजांच्या हल्ल्याचा बळी ठरत होता. पण काहींना हे तुष्टीकरण आवडले नाही. म्हणूनच ते हिंदू समाजाला बलशाली करू इच्छित होते. म्हणूनच त्यांनी हिंदू समाजासाठी हिंदू सभेची स्थापना डॉ. हेडगेवार यातही सहभागी होते. पण त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे असे म्हणता येईल की, या देशात सुरू असलेल्या जवळपास सर्वच आंदोलनांमध्ये त्यांचा केवळ सक्रि पाठिंबाच होता असे नाही तर ते त्यातही अग्रेसर राहिले.
संदर्भ : सुनील ओंकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वर्णिम भारत के दिशा-सूत्र, प्रभात पेपरैक्स, नई दिल्ली
: संघनिर्माता : चंद्रशेखर परमानन्द भिशीकर, सुरुचि प्रकाशन, केशव कुंज, झंडेवाला, नवी दिल्ली
रमेश पतंगे : डॉ. हेडगेवार: एक अनोखा नेतृत्व, सुरुचि प्रकाशन, केशव कुंज, झंडेवालान, नयी दिल्ली
भूतपूर्व सरकार्यवाह, स्व. प्रभाकर बळवंत दाणी (भैयाजी दाणी), संघ दर्शन, राष्ट्रधर्म पुस्तक प्रकाशन, लखनऊ
राकेश सिन्हा, आधुनिक भारत के निर्माता: डॉ. बलिराम हेडगेवार, प्रकाशन विभाग
प्र. ग. सहस्त्रबुद्धे, संघमंत्र के उद्गाता: डॉ. हेडगेवार, भारत भारती बाल पुस्तकमाला प्रकाशन, नागपूर
(विचार विनिमय न्यास दिल्ली)
Powered By Sangraha 9.0