इंडोनेशियातील मुुस्लिमांना हिंदू संस्कृतीचे आकर्षण

11 Oct 2024 18:29:49
संस्कृती
इंडोनेशियाचे आणि प्रथम राष्ट्रपती सुकार्णो यांची कन्या सुकमावती यांनी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी इस्लाम धर्माचा त्याग करून सनातन हिंदू धर्म स्वीकारला. Indonesia Hindus इंडोनेशियात हिंदूंची लोकसंख्या दोन टक्क्यांहून देखील कमी आहे. येथील १७ हजारांहून अधिक बेटांपैकी केवळ बाली या बेटावर हिंदू बहुसंख्यक आहेत. मात्र, असे असतानाही ज्या प्रकारे लोक हिंदू धर्मात परत आहेत, ते अभूतपूर्व व आर्श्चचकित करणारे आहे. इंडोनेशियाच्या हिंदूंकडे एखादी मोठी सामाजिक संघटना नाही किंवा राजकीय संघटन देखील नाही. त्यांच्याकडे कोणताही मठ, आश्रम नाही किंवा प्रसिद्ध व श्रीमंत उद्योगपती देखील नाही. तरीही त्या देशातील लोकांध्ये आपल्या पूर्वजांविषयीचा गौरव नव्याने जागृत झाला असून जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या देशातील लोक हिंदू र्ध स्वीकारण्यास आतूर झाले आहेत, असे स्पष्टपणे दिसून येते.
 
 
Hindu-3
 
७० च्या दशकामध्ये सर्वप्रथम सुलावेसी बेटावरील तोराजा लोकांनी हिंदू धर्मात परत येण्याची संधी प्राप्त झाली होती. वर्ष १९७७ मध्ये सुमात्राच्या कारो आणि बाटाक, तसेच वर्ष १९८० मध्ये कालीमंतनचे गाजू आणि दायक देखील हिंदूंच्या छत्रछायेत स्वधर्मात परत आले. त्यानंतर अनेक आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी, तसेच इस्लाम अन् ख्रिस्ती यांच्या दबावापासून वाचण्यासाठी स्वत:ला हिंदू घोषित केले. याशिवा वर्ष १९६५ मधील उलथापालथीच्या वेळी स्वत:ला मुसलमान घोषित करणार्‍या जमातीचे लक्षावधी लोक आता हिंदू धर्मात परत येत आहेत.
 
 
Indonesia Hindus : जावामध्ये शिक्षण झालेल्या सुदेवी १९९० साली न्यायाधीश नल्या होत्या. त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबात गेले. पण, तरीही त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. रविकुमार यांनी ‘इंडोनेशियातील हिंदूंचे पुनरुत्थान’ या आपल्या पुस्तकात इंडोनेशियातील १० लाखांहून अधिक मुसलमानांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले की, ‘वर्ष १९९९ च्या एका अहवालामध्ये ‘नॅशनल इंडोनेशियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक ने मान्य केले होते की, गेल्या दोन दशकांमध्ये जावा रहाणारे अंदाजे एक लाख लोक इस्लामचा त्याग करून अधिकृतपणे हिंदू धर्मात परत आले आहेत. वर्ष २०१७ मध्ये जावाची राजकुमारी कांजेंग महेंद्राणी हिनेही हिंदू धर्म स्वीकारला होता. अलिकडच्या वर्षांमध्ये सुकर्णोच्या कुटुंबीयांशी संंधित अनेक लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ज्यात सर्वांत ताजे नाव ‘सुकमावती’ यांचे आहे. इंडोनेशियामध्ये ‘सुकमावती’चा प्रभाव बघता त्यांचे त्यांच्या मागे हिंदू धर्मात परत येतील, असा अंदाज आहे.
 
 
सुकावतीने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर भारतीय माध्यमांनी प्रामुखने सबदापालन यांच्या भविष्यवाणीची आठवण करून दिली. वर्ष १४७८ मध्ये महापहित साम्राज्याचा शेवटचा शासक ब्रविज पंचम याने इस्लाम स्वीकारल्याने सबदापालन यांनी त्याला शाप दिला होता की, ५०० वर्षांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुसलमान झालेले सर्व आपल्या हिंदू धर्मात परत येतील आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करतील. हे खरे आहे की, वर्ष २००४ मध्ये हिंदी महासागरामध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये इंडोनेशियातील दोन लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००६ साली आलेल्या भूकंपामुळे ५ हजारांहून अधिक लोकांनी जीव गमावला होता. त्यानंतर जावामध्ये भूकंप आला होता. या घटनांमुळे तेथील सबदापालन यांच्या भविष्यवाणीकडे मोठ्या गांभीर्याने पाहात आहेत. तसेच अशा आपत्तींपासून रक्षण करण्यासाठी पूर्वजांच्या हिंदू धर्मामध्ये परत येत आहेत. पण असे असले, तरी हिंदू धर्म स्वीकारण्यामागे सबदापालनचा शाप आणि भविष्यवाणी एवढेच एक कारण नाही. काही अन् कारणेही आहेत. सर्वांत पहिले कारण म्हणजे इंडोनेशियातील लोकांना आपला खरा इतिहास समजला आहे, त्यांनी जाणून घेतला आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांविषयी त्यांच्या मनात गौरव व सन्मानाची भावना आहे. भारतीय मुसलमानांसमोर जर त्यांचा खरा इतिहास ठेवला, तर ते देखील आपल्या मूळ धर्मात परत येण्याविषयी निश्चितच विचार करतील, असे प्रसिद्ध प्राध्यापक शंकर शरण यांनी नमूद केले होते.
 
 
Indonesia Hindus : स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाल्यानंतरही हिंदूबहुल देशात अद्याप मोठ्या मुस्लिमांनी घरवापसी केलेली नाही. परंतु, मुसलमानबहुल इंडोनेशियाने हे करून दाखवले आहे. येथे मजपहित साम्राज् आणि अन्य हिंदू साम्राज्य यांच्या यशाला अतिश महत्त्व दिले जाते. ‘गजह मद’ यांच्यासारखे हिंदू सेनापती येथील राष्ट्री नायक आहेत. येथील मुसलमानांना माहीत आहे की, त्यांचे पूर्वज तुर्क किंवा अफगाणिस्तान येथून आलेले आक्रमक, लुटारू नव्हते, सर्वधर्मसमन्वयाची भावना असलेले, उच्च नैतिक व आध्यात्मिक मूल्ये जपणारे हिंदूच होते. त्यामुळे आपल्या भूतकाळातील मूळ हिंदू धर्मात प्रवेश करणे आणि पूर्वजांच्या धर्माचा स्वीकार करणे, हा येथे अभिमानाचा विष बनला आहे.
 
 
Indonesia Hindus : येथील संस्कृतीवर रामायण आणि महाभारत या ग्रंथांचा मोठा प्रभाव आहे. इंडोनेशियाची रामलीला जगभरात प्रसिद्ध आहे. सुकार्णोच्या काळात एकदा पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाला इंडोनेशियामध्ये रामलीला पहाण्याची संधी मिळाली. तेव्हा एका इस्लामी राष्ट्रामध्ये रामलीला सादर होत असल्याविषयी या प्रतिनिधी मंडळातील लोकांना अतिश आश्चर्य वाटले होते. हा प्रश्न त्यांनी सुकार्णो यांनाही विचारला. तेव्हा सुकार्णो यांनी त्वरित उत्तर दिले की, ‘इस्लाम आमचा धर्म आहे, तर रामायण आमची संस्कृती आहे !’ इंडोनेशियाच्या मुसलमानांना रामायण महाभारत या ग्रंथांविषयी उत्तम माहिती आहे. येथील लोकांच्या नसानसात या दोन महान ग्रंथांतील चरित्रे वास करतात. येथे घरोघरी रामायण आणि महाभारताचे वाचन, मनन, चिंतन केले जाते. इंडोनेशियात रामायण आणि महाभारत यांच्यातील चरित्रांच्या आधारावर मुला-मुलींचे नाव ठेवणे ही सर्वसामान् गोष्ट आहे. येथे या चरित्रांचा उपयोग शाले शिक्षणासाठीही होत असतो. शिवाय वर्षभर रामायण आणि महाभारत यांच्यावर आधारित कार्यक्रम होत असतात. रामायण आणि महाभारत यांच्या जबरदस्त प्रभावामुळे इंडोनेशियातील मुसलमान हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत. आज इंडोनेशियाचे मुसलमान कुराणही वाचतात आणि रामायण-महाभारतही वाचतात. हिंदीचे प्रसिद्ध विद्वान फादर कामिल बुल्के यांनी १९८२ मध्ये आपल्या एका लेखामध्ये लिहिले होते, ‘३५ वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने गावामध्ये एका मुसलमान शिक्षकाला रामायण वाचताना पाहिले. तेव्हा त्याने शिक्षकाला विचारले की, तुम्ही रामायण का वाचत आहात ? तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी अधिक चांगला मनुष्य बनण्यासाठी रामायण वाचत आहे.’’ 
 
(संकलित)
Powered By Sangraha 9.0