राणी दुर्गावतींचे अद्वितीय युद्धधोरण

    दिनांक :11-Oct-2024
Total Views |
इतिहास
Rani Durgavati : राणी दुर्गावतीचे गोंडवाना राज्य अतिशय समृद्ध असून राज्यात सर्वत्र समृद्धी, सुबत्ता, शांती आहे आणि राणीच्या राजवटीखालील प्रजा अतिशय सुखी व आहे, असे खुद्द कडा आणि माणिकपूरचा सुभेदार आसफखान याने दिल्लीच्या मोगल दरबारात जाहीरपणे सांगितले होते. धूर्त, वासनांध आणि चलाख बादशहा अकबराला वाटले ही दुर्बळ व विधवा राणी का आपल्या प्रजेचे संरक्षण करणार? विधवा राणीला असहाय समजून त्याने गोंडवाना राज्य ताब्यात घेण्याच्या इराद्याने राणी दुर्गावतीला शरण येण्याची धमकी दिली आणि दूताद्वारे पत्र पाठवले. ‘‘अपनी सीमा राज की, अमल करो परमान| भेजो नाग सुपेत सोई, अरू अधार दीवान॥ असे त्याने पत्रात नमूद केले.
 
 
Rani-1
 
पण गोंडवानाची निर्भीड, स्वाभिानी, स्वातंत्र्यप्रिय आणि स्व ची प्रतिमूर्ती शूर राणी दुर्गावतीने अकबराची मागणी ठोकरून लावली. मग अकबराचा आणखी एक संदेश आला की स्त्रियांचे का कातणे तेव्हा राणीने प्रत्युत्तरात आपल्या संदेशासह सोन्याची अंगठी बादशहाला पाठवली आणि म्हणाली की तुमचे काम देखील कापूस वेचणे हे आहे. राणीचे हे बाणेदार उत्तर ऐकून अकबर ज्वालामुखीसारखा भडकला. अतिशय संतप्त होऊन त्याने सुभेदार आसफ खानाला गोंडवाना साम्राज्याचा विनाश व लूट करण्यासाठी पाठवले. तत्पूर्वी अकबराने अनुक्रमे गोप महापात्र आणि नरहरी महापात्र दोन हेरांना अर्थात गुप्तचरांना गोंडवनात पाठवले. पण चतुर व चाणाक्ष वीरांगना राणी दुर्गावतीने या दोघांनाही आपल्या बाजूने वळविले. त्यांनी राणी दुर्गावतीला अकबराची योजना आणि आसफ खानाच्या संभाव् आक्रमणाविषयी सर्व काही सांगितले.
 
 
राणी दुर्गावतीच्या मोगलांशी झालेल्या ६ भीषण लढाया
Rani Durgavati : मोगल सेना गोंडवनावर चालून येणार याची माहिती आधीच मिळाल्याने राणी दुर्गावती सावध झाली आणि तिने सिंगौरगडावर ठाण मांडले. आसफ खान ६ हजार घोडदळ, १२ हजार पायदळ आणि तोफखाना तसेच स्थानिक मोघल सरदारांसह सिंगोरगड येथे येऊन धडकला. दुसरीकडे खुद्द राणी दुर्गावती, तिचा पुत्र वीर नारायण सिंह, आधार सिंह, गजदल सेनापती अर्जुनसिंह बैस, कुंवर कल्याणसिंह बघेला, चक्रमण कलचुरी, महारुख ब्राह्मण, वीर शम्स मुबारक बिलुच, खान जहान डकीत यांनी मोर्चा सांभाळला. मुख् म्हणजे राणी दुर्गावतीची बहीण कमलावती आणि पुरागडची राजकुमारी (वीर नारायण सिंहची होणारी पत्नी) महिला पथकाचे नेतृत्व करीत होत्या. युद्ध लगेच सुरू झाले.
 
 
आसफखानाची दाणादाण
आसफ खान सिंगोरगड येथे चालून आला. आपल्या बलाढ्य फौजेच्या बळावर राणीच्या सेनेला आपण सहज नमवू असे वाटत होते. त्याने शरणागती पत्करण्यास सांगितले. वीरांगना राणी दुर्गावती म्हणाली, ‘राज्यकर्त्याच्या नोकराशी या संदर्भात बोलता येणार नाही. एवढे बोलूनच राणी थांबली नाही तर तिने तलवार हाती घेऊन मोगली सैन्यावर जबरदस्त हल्ला चढविला. राणीचा हा भीषण आवेश व प्रखर पराक्रम पाहून मोगल सैनिक गर्भगळित झाले. राणीने स्वत: आघाडीवर राहून मोगली दोन हात करीत त्यांची अक्षरश: दाणदाण उडविली. तिचा रुद्रावतार पाहून मोगलांचे पा लटपटले. मोगल सैनिकांना राणीच्या फौजेने कापून काढले. राणी दुर्गावती तलवार उगारत आसफखानाच्या दिशेने वेगाने येऊ लागली. आपली आता धडगत नाही, हे लक्षात येताच खुद्द सुभेदार आसफ खान फौजेसह पळत सुटला आणि कसाबसा गोंड सैनिकांच्या गराड्यातून निसटला.
 
 
सिंगोरगडची लढाई : पहिल्या युद्धाप्रमाणेच दुसर्‍या युद्धातही मोगलांची दाणादाण उडाली. पण, यावेळी त्यांचे नशीब जोरावर होते. वास्तविक मोगल सैनिकांवर पुन्हा पळून जाण्याची वेळ आली होती. पण, ऐन शेवटच्या क्षणी मोगलांचा तोफखाना युद्धस्थळावर पोहोचला. राणीला याची माहिती मिळाली. तिने सिंगोेरगड सोडून दिले आणि गढा येथे ती फौजेसह रवाना झाली.
 
 
सिंगोरगडची तिसरी
गोंडवाना सेनेचे सेनापती अर्जुनसिंग बैस यांनी जबरदस्त पराक्रम गाजवून मोगलांना मागे हटण्यास भाग पाडले. पण पुन्हा आधीप्रमाणेच येथेही मोगलांचा तोफखाना वरचढ ठरला. त्यामुळे डावपेच म्हणून किल्ला सोडून देण्यात आला.
 
 
चंडाल भाटा (अघोरीचे युद्ध)
Rani Durgavati : मोगल आणि राणीच्या सैनिकांमधील हे चौथे ुद्ध होते. कुठल्याही परिस्थितीत मोगल सैन्याला परतवून लावायचेच, हेच गोंडवाना उद्दिष्ट होते. कारण मोगलांना मागे हटविले तरच वीरांगना राणी दुर्गावती गढा येथून बरेलाच्या घनदाट जंगलात जाऊ शकत होती. अखेर चंडाल भाटाच्या मैदानात आणखी एक घनघोर युद्ध झाले. राणी दुर्गावतीचे सैनिक कमालीच्या आवेशाने लढत होते. खुद्द सेनापती अर्जुनसिंह बैस आघाडीवर राहून आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवत होता. त्याने खुद्द सुभेदार आसफ दिशेने धडक मारली आणि अतिश जोरात ुद्ध केले. सेनापती अर्जुनसिंहने एवढे भंकर युद्ध केले की आसफखानला पुन्हा पळून जावे लागले. पळून जाणार्‍या आसफखानचा अर्जुनसिंहने जोरात पाठलाग सुरू केला आणि त्याला खूप दूरपर्यंत पिटाळून लावले. इकडे राणी दुर्गावतीने मोगली तोफखान्याचा सामना करण्यासाठी एक जबरदस्त रणनीती आखली, त्यानुसार बरेला (नरई) च्या आणि घनदाट जंगलाच्या बरोबर मध्भागी ठाण मांडले. यामुळे मोगली तोफगोळे तेथपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
 
 
गौर नदीचे युद्ध
Rani Durgavati : तोफखाना वाहून नेण्यासाठी आसफ खानने गौर नदीवर पूल बांधला. तो पूल उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेले महारथी अर्जुनसिंह बैस लढताना हुतात्मा झाले. वीरांगना राणी दुर्गावतीच्या जीवनातील १५ व्या मोठ्या आणि मोगलांसोबतच्या पाचव्या युद्धाला २२ १५६४ रोजी प्रारंभ झाला. स्वातंत्र्, स्वाभिमान आणि र्शौाची देवी - जगातील सर्वात महान योद्धा राणी दुर्गावतीला सकाळीच सेनापती अर्जुनसिंह बैस यांच्या बलिदानाची बातमी मिळाली. शत्रू उंबरठ्याशी येऊन ठेपला होता. राणीने तातडीने सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन ‘अर्धचंद्र व्यूह’ बनवला आणि ‘गौर नदीच्या युद्धा’त सुभेदार आसफखानसह मोगल सैन्यावर जोरदार हल्ला आणि मोगलांनी उभारलेला पूल पार उद्ध्वस्त करून टाकला जेणेकरून शत्रूचा तोफखाना नरई (बरेला) येथे पोहोचू शकणार नाही. राणीची व्यूहरचना अगदी अचूक ठरली. मोगली सेनेची अक्षरश: दाणादाण उडाली. त्यांची पळापळ सुरू झाली, मोगल सैन् पांगले आणि वाट दिसेल तिथून पळत सुटले. राणी दुर्गावतीने पुन्हा रात्री मोगलांवर हल्ला करण्याची योजना आखली परंतु वरिष्ठ सेनाधिकार्‍यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे राणीला निर्ण बदलावा लागला. मात्र, ही फार मोठी चूक ठरली, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. त्याच रात्री मोगली फौजेवर पुन्हा हल्ला चढविला असता तर सुभेदार आसफखानचा निर्णायक पराभव झाला असता व सारा इतिहासच बदलून गेला असता, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
 
नरईचे भयंकर युद्ध राणी दुर्गावतींचे बलिदान
Rani Durgavati : अखेर, वीरांगना राणी दुर्गावतीने नरईच्या दिशेने कूच केले.युद्धात तिने ‘क्रौंच व्यूह’ रचला. २३ जून १५६४ रोजी नरई येथे पहिली चकमक झाली. राणी व तिच्या सैनिकांनी मोगलांची पार दुर्दशा केली. सुभेदार आसफखानसह मोगली सेना पुन्हा पळत सुटली आणि घाबरून बरेला पर्यंत पोहोचली. २३ जूनच्या रात्री मोगलांचा गौर नदी पार करून बरेला येथे दाखल झाला. मात्र, २३ जूनच्या रात्री राणीविरुद्ध घातक कटकारस्थान रचण्यात आले. आसफ खानने राणीचा एक सामंत अर्थात जहागीरदार बदनसिंह याला लाच देऊन आपल्या बाजूने वळवून घेतले. त्याने राणीची रणनीती उघड केली. उद्या युद्धात राणी मोगलांना घनदाट जंगलाकडे येण्यास भाग पाडेल, जिथे तोफखाना उपयोगी नाही आणि सर्व मोगल सैनिक मारले जातील, अशी ती व्यूहरचना होती. फितूर बदनसिंहने ही व्यूहरचना मोगल सुभेदाराला सांगितली. हे ऐकून आसफखान घाबरला. त्याने यावर का उपाय करता येईल, असे बदनसिंहला विचारले. तेव्हा बदनसिंहने सांगितले की नरई नाला कोरडा पडला आहे आणि त्याच्या जवळ एक डोंगरी तलाव आहे. जर त्या बांध फोडला तर नरई नाला पाण्याने भरून जाईल आणि राणीला तो ओलांडता येणार नाही आणि त्यामुळे तिच्या सैनिकांवर तोफांचा थेट मारा करता येईल. वास्तविक राणीला काहीतरी अप्रि होण्याचे संकेत आधीच मिळाले होते. तिने रात्रीच हल्ला करण्याचा प्रस्ताव च्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांसमोर ठेवला. परंतु त्यांनी तो मान्य केला नाही. शेवटी अंतिम घटिका समीप आली. शूर राणी दुर्गावतीने ‘क्रौंच व्यूह’ रचला. सारस पक्षासारखे सैनिक गोळा केले. २४ जून १५६४ रोजी सकाळी १० च्या सुमारास भंकर युद्ध सुरू झाले आणि पहिल्याच हल्ल्यात मोगलांची पार दाणादाण उडाली. मोगलांनी तीनदा हल्ला केला आणि गोंड सैनिकांनी तिन्ही वेळेस जबरदस्त प्रतिकार करून मोगलांना परतवून लावले. मोगलांनी तोफखान्याच्या दिशेने आघाडी उघडली. राणी दुर्गावती ठरवलेल्या योजनेनुसार घनदाट जंगलाकडे वाटचाल करू लागली. पण फितूर बदनसिंहाच्या योजनेनुसार डोंगरावरील तलावाची भिंत फोडण्यात आली. त्यामुळे नरईत पूरसदृश् परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राणी दुर्गावती या पुरात अडकली. दरम्यान, दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीरनारायण जखमी झाल्याची बातमी आली. पण शूर राणी दुर्गावती डगमगली नाही. डोळ्याला बाण लागल्यावरही तिने युद्ध सुरूच ठेवले. दुसरीकडे मोगल सैन्याचीही अवस्था वाईट होती. पण अचानक एक बाण राणीच्या मानेवर लागला. अखेर अधरसिंहने सरमन हत्तीच्या माहुताला माघार घेण्याचा आदेश दिला. आपण आता फार काळ जिवंत राहू शकणार नाही, हे राणीला समजले. म्हणून तिने स्वत:लाच मारण्याचा आदेश अधरसिंहला दिला. अधरसिंहने वीरांगनेस मारण्यास नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत मोगलांच्या हाती जिवंत सापडायचे नाही, हा राणीचा निर्धार होता. अखेर शूर राणी दुर्गावतीने स्वत:च्याच पोटात खंजीर खुपसून सर्वोच्च बलिदान दिले. या लढाईत राणीच्या ७०० सैनिकांना हौतात्म् आले. तर दुसरीकडे मगशगलांचे २००० सैनिक ठार झाले.
 
 
गोंडवानाच्या रक्षणाची स्फूर्ती गाथा
Rani Durgavati : राणी दुर्गावतीचे गोंडवाना राज्य समृद्ध असून राज्यात सर्वत्र समृद्धी, सुबत्ता, शांती आहे आणि राणीच्या राजवटीखालील प्रजा अतिशय सुखी व आनंदी आहे असे खुद्द कडा आणि माणिकपूरचा मोगल सुभेदार आसफखान याने दिल्ली दरबारात बादशाह अकबराला जाहीरपणे सांगितले होते. याचे इतिहासात विविध दाखले आहेत.
(पांचजन्यवरून साभार)