लाल मातीच्या कोर्टचा राजा होतोय् निवृत्त

12 Oct 2024 06:00:00
वेध
- मिलिंद महाजन
२२ वेळा ग्रॅण्ड स्लॅम विजेता स्पेनचा स्टार टेनिसपटू Rafael Nadal राफेल नदाल याने पुढील महिन्यात स्पेनमधील मालागा येथे होणार्‍या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त घोषणा केली आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी नदाल निवृत्त होत असल्याची बातमी ऐकून टेनिस वर्तुळात चर्चा सुरू झाली.
 
 
NADAL--FOR-VED
 
एक दशकाहून अधिक काळ रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच सोबत ‘बिग थ्री’ म्हणून नदालने पुरुषांच्या टेनिसमध्ये लौकिक मिळवला. राफेलने फेडरर व जोकोविच या प्रतिस्पर्ध्यांशी चिवट झुंज देत २२ ग्रॅण्ड स्लॅम एकेरी जिंकले, यात त्याच्या विक्रमी १४ फ्रेंच ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीने राफेल नदालला टेनिसचा महान खेळाडू आणि‘लाल मातीच्या कोर्टवरील निर्विवाद राजा’ (किंग ऑफ क्ले) केले.
 
 
२००८ च्या विम्बल्डन स्पर्धेतील Rafael Nadal नदाल विरुद्ध फेडरर यांच्यातील अंतिम सामना तसेच २०२२ च्या फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत नदाल विरुद्ध जोकोविच आणि २०१२ ऑस्ट्रेलियन ओपनमधील नदाल विरुद्ध जोकोविच अंतिम सामना खूपच गाजला होता. २०२२ हंगामाच्या अखेरीस ४१ वर्षांचा असताना फेडररने निवृत्तीची घोषणा केली. राफेल नदाल आपल्या देखण्या कामगिरीच्या बळावर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) द्वारे जागतिक क्रमवारीत २०९ आठवडे प्रथम क्रमांकावर राहिला आहे व वर्षाच्या अखेरीस तो पाच वेळा अव्वल क्रमांकावर राहिला नदालने विक्रमी १४ फ्रेंच ओपन विजेतेपदासह २२ ग्रॅण्ड स्लॅम पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची किमया केली आहेच; याशिवाय त्याने ९२ एटीपी-स्तरीय एकेरी खिताब जिंकले आहेत. यात ३६ मास्टर्स व ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्यापैकी ६३ क्ले कोर्टवर आहेत. एकेरीमध्ये करीअर गोल्डन स्लॅम पूर्ण करणार्‍या तीन पुरुषांपैकी नदाल एक आहे. क्ले त्याचे सलग ८१ विजय हे खुल्या टेनिस जगतातील सर्वात लांब विजयी प्रवास आहे. आपल्या व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरुवातीला नदाल एटीपी टूर इतिहासातील सर्वात यशस्वी किशोरांपैकी एक टेनिसपटू ठरला. २० वर्षांचा होण्यापूर्वी त्याने १६ विजेतेपद जिंकले, ज्यात त्याच्या पहिल्या फ्रेंच ओपन व मास्टर्स स्पर्धांचा समावेश आहे. या काळात त्याने क्ले कोर्टचा टेनिसपटू अशी प्रतिमा निर्माण केली. ऐतिहासिक विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात फेडररला पराभूत केल्यानंतर २००८ मध्ये नदालने प्रथमच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले, हा त्याचा पहिला मोठा विजय आहे. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने ऑलिम्पिक एकेरी सुवर्णपदकासह विजयाचा पाठपुरावा केला. २०१० च्या अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत केल्यानंतर २४ वर्षीय नदाल ग्रॅण्ड स्लॅम मिळविणारा खुल्या टेनिस जगतातील सर्वात तरुण आणि तीन वेगवेगळ्या कोर्टवर (कठीण, गवत व चिकणमातीच्या कोर्टवर) मेजर जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला.
 
 
Rafael Nadal : दुखापतींनी ग्रासलेल्या दोन हंगामांनंतर, नदाल २०१३ मध्ये टेनिस कोर्टवर परतला व त्याने १४ अंतिम फेरी गाठली. त्याने अमेरिकन ओपन सिरीजसह दोन प्रमुख व पाच मास्टर्स स्पर्धा त्याने फ्रेंच ओपनमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. मार्क लोपेझसह २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जेतेपद, दोन अमेरिकन ओपन जेतेपद, एक ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आणि ऑलिम्पिक दुहेरीत सुवर्णपदक मिळविले. नदालने २०२२ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम पुरुष एकेरी विजेतेपदांचा जोकोविच व फेडररसोबतचा संयुक्त विक्रम मोडला व एकेरीतील दुहेरी करीअर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण इतिहासातील चार पुरुषांपैकी एक झाला. वाढत्या वयानुसार नदालच्या दुखापतीच्या समस्याही वाढल्या. त्याची गत दोन वर्षे खूप कठीण गेली आहेत. आपण मर्यादेच्या पलीकडे खेळू शकणार नाही, असे त्याला स्वतःला जाणवले, त्यामुळे त्याने आता खेळणे थांबवण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला सुरुवात व शेवट असतो, असे म्हणत नदालने देशासाठी अखेरचे खेळण्याची असल्यामुळे तो पुढील महिन्यात डेव्हिस चषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. यापूर्वी तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी अखेरचा खेळला होता. भविष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांच्या हातून टेनिसमध्ये सेवा घडो, ही अपेक्षा. 
 
- ७२७६३७७३१८
Powered By Sangraha 9.0