इराणच्या आण्विक स्थळांवर मोठा सायबर हल्ला!

13 Oct 2024 18:33:51
- अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत
 
तेहरान, 
Cyber ​​attack on nuclear sites इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणच्या आण्विक ठिकाणांसह अनेक अस्थापनांवर एकाचवेळी सायबर हल्ले झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामुळे सरकारच्या अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून हा हल्ला करण्याच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
Cyber ​​attack
 
Cyber ​​attack on nuclear sites  सायबर हल्ल्यात इराणच्या आण्विक अस्थापनांना देखील लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला अशावेळी करण्यात आला, जेव्हा १ ऑक्टोबरला क्षेपणास्त्र हल्ल्याच्या विरोधात इस्रायलने प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला होता. इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी जाहीर केले की, न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी दलांना गंभीर सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे. आमच्या अणुप्रकल्पांवर तसेच इंधन वितरण, नगरपालिका सेवा, वाहतूक बंदरे यासार‘या गंभीर नेटवर्कवरही सायबर हल्ला झाला आहे. या घटना देशभर पसरलेल्या अनेक क्षेत्रांचा छोटासा भाग आहेत.
 
 
इस्रायलने दिला होता इशारा
या आधी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इशारा दिला होता की, नुकत्याच झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचे उत्तर लवकरच देण्यात येईल. ते म्हणाले की, इस्रायलचा बदला घातक आणि आश्चर्यजनक असेल. उत्तर नंतर इस्रायलने आता लेबनॉनमध्ये हिजबल्लाहच्या आक‘मकांविरूद्ध जमिनीवरून हल्ला चढवला आहे.
Powered By Sangraha 9.0