शरद पवारांनी आयुष्यभर दुसर्‍यांचे पक्षच फोडले

    दिनांक :13-Oct-2024
Total Views |
- राज ठाकरेंचा घणाघात
 
मुंबई, 
भाजपाने आमचा पक्ष फोडला, असा आरोप शरद पवार सातत्याने करीत असतात. माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही आयुष्यभर काय केले? १९७८ मध्ये काँग्रेस फोडली. १९९१ मध्ये शिवसेना नंतर नारायण राणेंचे प्रकरण झाले. तुम्ही आयुष्यभर फोडाफोडीचेच काम करीत आला, असा घणाघाती हल्ला मनसेचे अध्यक्ष Raj Thackeray राज ठाकरे यांनी चढविला.
 
 
Raj
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेत आहेत. ते म्हणाले की, महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांबद्दल मी यापूर्वीच बोललो होतो. अजित पवार महायुतीत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांना कारागृहात टाकण्याची भाषा केली होती. मात्र, त्यांना थेट मंत्रिमंडळात घेतले. लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले जात आहेत. मला यामागचा उद्देशच कळत नाही. आज मी तुम्हाला हे लिहून देतो, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला पैसे येतील. मात्र, निवडणुका झाल्या की पैसे येणार नाही. जानेवारी-फेब्रुवारीत अशी परिस्थिती निर्माण होईल की, या सरकारकडे पगार देण्याइतपतही पैसे राहणार नाही, असे म्हणत Raj Thackeray राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.