महाराष्ट्रातील नागरिक राजकीय बदलासाठी उत्सुक

    दिनांक :13-Oct-2024
Total Views |
- शरद पवार यांचा दावा
 
मुंबई, 
महाराष्ट्रातील नागरिक राजकीय बदलासाठी आहेत आणि त्यांच्या भावना विधानसभा निवडणुकीत दिसून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख Sharad Pawar शरद पवार यांनी रविवारी केला. देशात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणार्‍या राज्याच्या प्रशासनाचे महायुतीच्या काळात खच्चीकरण करण्यात आल्याचा दावा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पत्रपरिषदेत केला. सध्या सत्तेत असलेल्या सरकारच्या तावडीतून लोकांना मुक्त करण्याची आमची आहे आणि नागरिक आम्हाला पाठिंबा देतील, असा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत केली जाईल, असा विश्वास असल्याचे शरद पवार म्हणाले.
 
 

PTI10_13_2024_000086B
 
महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजपा आणि अजित पवार प्रमुख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. अलिकडेच झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मतांच्या टक्केवारीत केवळ ०.६ टक्क्याचा फरक आहे. असे असले तरी, भाजपाला जास्त जागा मिळाल्या, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
 
 
Sharad Pawar : केवळ जम्मू-काश्मिरातील निवडणुकीचीच चर्चा का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करताना, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर भाजपाला येथे बहुमत मिळायला पाहिजे होते, असे ठाकरे म्हणाले. काँग्रेसने बंजारा समाजासाठी काहीच केले नाही, असे नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी टीका केली. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा मान मिळवणारे वसंतराव नाईक हे त्याच समाजातील असल्याचे नरेंद्र मोदी विसरले, असे शरद पवार म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्याकडून अधिकृत समारंभात केली जाणारी राजकीय वक्तव्ये कधीच स्वीकारणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.