अभिनेत्री शर्वरी झाली वामन हरी पेठे ज्वेलर्सची ब्रॉंड अ‍ॅम्बेसेडर

    दिनांक :14-Oct-2024
Total Views |
- उघडले २७ वे शोरूम
 
मुंबई, 
Actress Sharvari : वामन हरी पेठे ज्वेलर्स १९०९ पासून विश्वासार्ह मराठी ज्वेलर्स असून, त्यांनी नुकताच फिनिक्स मार्केट सिटी, मुंबई येथे आपल्या २७ व्या उद्घाटन केले. बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्रॉंड अ‍ॅम्बेसेडर शर्वरीने विभा कलेक्शन बाजारात आणले आहे. यात पारंपरिक जोंधळे माळ याचा एक आधुनिक ट्विस्ट आहे.
 
 
sharvari-ribbon-cutting
 
एक महाराष्ट्रीयन म्हणून वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कुटुंबाचा एक भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स आजपर्यंत आम्हाला पारंपरिक मराठी आणि आधुनिक दागिने आले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक स्त्रीची विश्वासार्ह निवड बनले आहे. माझ्या कुटुंबात आजी, आई, बहीण आणि आता मला या उत्तम दागिन्यांचे कलेक्शन ठेवण्याची आणि त्यांना परिधान करण्याची आवड आहे, असे वामन हरी पेठे ज्वेलर्सची ब्रॉंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून शर्वरीने सांगितले.
 
 
 
Actress Sharvari : एक नवीन पर्व साजरे करण्यासाठी वामन हरी पेठे ज्वेलर्स सोने शुल्कावर २५ टक्के आणि हिरे बनवण्याच्या शुल्कावर ५० टक्के सूट देत आहे. आम्ही आधुनिकतेचा स्वीकार करताना परंपरेचा आदर करतो, असे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार आशिष पेठे म्हणाले. वामन हरी पेठे ज्वेलर्स १९०९ पासून विश्वासार्ह आहे. मार्च २०२५ पर्यंत चार नवीन शोरूम उघडण्यासाठी वामन हरी पेठे ज्वेलर्स सज्ज आहे. आणि माझी चमू आणखी ३० दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी अथकपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स आपल्या ग्राहकांना सोने, चांदी, हिरे आणि पोल्कीसाठी सर्वोत्तम शॉप स्टॉपर आहे. परंपरा आणि आधुनिकतेचे परिपूर्ण मिश्रण असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स लवकरच नवीन क्षितिजांना स्पर्श करणार आहे.