मित्रपक्षांना नाराज करू नका

    दिनांक :14-Oct-2024
Total Views |
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत भाजपाची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली, 
BJP meeting महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपाची आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत जागावाटप उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याचे समजते. कुठल्याही स्थितीत मित्रपक्षांना नाराज करू नका, असा सल्ला या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला आहे. भाजपा मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे संघटन महासचिव बी. एल. संतोष, महासचिव विनोद तावडे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशीष शेलार प्रभृती नेते यावेळी उपस्थित होते.
 
 
bjp miting
 
BJP meeting महाराष्ट्रात आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे मित्रपक्षांना नाराज करू नका, असा सल्ला या बैठकीत देण्यात आला. सामूहिक विधानसभा निवडणूक लढवली जाईल. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतर मित्रपक्षांशी चर्चा करून घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. हरयाणातील निवडणूक आपण अतिशय प्रतिकूल वातावरणात जिंकली. महाराष्ट्रातील निवडणूकही आपल्याला कोणत्याही स्थितीत जिंकायची आहे, त्यामुळे सर्वांनी जिद्दीने कामाला लागण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
 
 
केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार निश्चित मंगळवारी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असल्याचे समजते.