विरोधकांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाही

    दिनांक :14-Oct-2024
Total Views |
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले

मुंबई, 
उद्योगपतींच्या घराखाली पोलिसांकडून स्फोटके ठेवणार्‍या, पोलिसांकडून निर्दोष व्यापार्‍याची हत्या करणार्‍या, कोट्यवधींच्या वसुलीप्रकरणी गृहमंत्री तुरुंगात जाणार्‍यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या गप्पा आणि बदलापूरच्या चिमुकल्यांवर अत्याचार करणार्‍यांची बाजू घेणार्‍यांना नैतिकेतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी सकाळी पार पडली.
 

shinde 
 
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आमच्या काळात पोलिसांनी आरोपीवर गोळी चालवली, विरोधक गोळी का चालवली, असे विचारतात. हे डबल ढोलकी लोक आहेत. यांना कोणतीही नैतिकता नाही. बदलापूरमध्ये अत्याचार करणार्‍याची बाजू घेणार्‍या या लोकांना नैतिकतेविषयी बोलण्याचा अधिकार नाही.
मारेकर्‍यांना फाशी दिल्याशिवाय राहणार नाही
बाबा सिद्दिकी यांची हत्या दुर्दैवी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ज्यांना धमक्या मिळत आहे, त्यांच्या जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ती पूर्णपणे पार पाडत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येणार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. बाहेरील राज्यातून मुंबईत येऊन दादागिरी करणार्‍यांना आम्ही खपवून घेणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.