हरयाणाच्या विजय मंत्राचा बोध

14 Oct 2024 06:00:00
कानोसा
- अमोल पुसदकर
Haryana election : प्रकारच्या एक्झिट पोलचे निकाल चुकीचे ठरवून तसेच तमाम विरोधी पक्ष, चुकीचे नॅरेटिव्ह (कथानक) समाजामध्ये पसरविणारे लोक व शेतकरी नाराज आहेत, अशी बोंब उठविणारे लोक या सर्वांच्या नाकावर टिच्चून भारतीय जनता पार्टीने हरयाणामध्ये तिसर्‍यांदा आपले सरकार बनविले आहे. जनतेने त्यांना पुन्हा एकदा चांगले काम करण्याची संधी दिलेली आहे. भाजपाच्या नेतृत्वामध्ये हा दिल्लीचा आधारस्तंभ बनेल आणि जे खलिस्तानवादी विनाकारण शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीचे रस्ते अवरुद्ध करतात, त्यांनाही खीळ बसविण्यात हरयाणा आणि भाजपा यशस्वी होतील, असा विश्वास आहे. भाजपाने हरयाणासारख्या लहान परंतु महत्त्वाच्या राज्याची परीक्षा उत्तीर्ण केलेली असली, तरीही आता महाराष्ट्राची परीक्षा तोंडावर आलेली आहे. अशा परिस्थितीत ज्यावेळेस सर्व एक्झिट पोल सरकार येणार म्हणत होते, जनता भाजपाच्या बाजूने नाही म्हणत होते, त्यावेळेस भाजपाने असे काय केले की, जेणेकरून त्यांचा विजयरथ काँग्रेस रोखू शकली नाही, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातून महाराष्ट्राला काय बोध घ्यायचा तो महाराष्ट्राने घेतला पाहिजे.
 
 
Haryana election
 
Haryana election : लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपाच्या बरोबरीत येऊन पोहोचली होती. दोघांनाही लोकसभेच्या पाच-पाच जागा त्यावरून काँग्रेस म्हणायला लागली की, लोकसभेमध्ये यांना केले हाप, आता विधानसभेत यांना करू पूर्ण साफ! तिकीट वितरण हे नेहमीच एक जिकिरीचे कार्य असते. काँग्रेसमध्ये याच्यामुळे प्रचंड राजी-नाराजी होती तर भाजपामध्येही मोठमोठे नेते निवडणुकीच्या तोंडावर पार्टी सोडून गेले. परंतु काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा ज्यांचा दलित समाजामध्ये मोठा चाहता वर्ग आहे, काँग्रेसने तिकीट वितरणात बरोबर सहभागी करून घेतले नाही, त्यामुळे त्या नाखूश होत्या व प्रचारांमध्ये जवळपास एक हप्ता त्या सामीलच झाल्या नाही, या गोष्टीचा भाजपाने पुरेपूर उपयोग केला व भाजपाच्या मंचावरून काँग्रेसमध्ये दलितांना न्याय दिला जात नाही, अशा पद्धतीची ओरड सुरू केली. त्यामुळे दलित मतदारांमध्ये काँग्रेसबद्दल नाराजी पसरत गेली. काँग्रेस जाट लोकांची पार्टी आहे व आम्हाला तिथे काही स्थान नाही, अशा पद्धतीची भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळे दलित मतदार काँग्रेसपासून दूर झाला. भाजपाने दलित मतदारांना आपल्या जवळ आणण्यासाठी विशेष रणनीती बनविली आणि त्याद्वारे ते अधिकाधिक दलित समाजापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातही असेच काही करण्याची आवश्यकता आहे. जाटव्यतिरिक्त जो इतर समाज आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा भाजपा पोहोचला व लोकसभेसारखे जाट मत जर काँग्रेसच्या पारड्यात गेले तर आपल्या पारड्यात काय राहील, यासाठी जाट व्यतिरिक्त इतरही सर्व समाजांना एकत्रित करण्याचा भाजपाने चंग बांधला. त्याचाच परिणाम म्हणून जाट व्यतिरिक्त इतर ओबीसी समाज हा भाजपाच्या बाजूला झुकला गेला. यावरून आपल्या असे लक्षात येते की, राज्य असो; परंतु जातीय समीकरणे ही असतातच. त्या अनुषंगाने तिकीट वाटप व इतर राज्यातील त्या त्या समाजाच्या नेत्यांना आपल्या राज्यामध्ये फिरविले पाहिजे व मतदारांना आकृष्ट केले पाहिजे. हरयाणामध्ये भाजपाचे चार प्रभारी असलेले विप्लव कुमार देव, धर्मेंद्र प्रधान, सुरेंद्र नागर व सतीश पुनिया यांनी आपापल्या जागा वाटून घेत त्या मतदारसंघांमध्ये सूक्ष्म केले व चमत्कार घडवून आणला. जे कधीच झाले नाही ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी करून दाखविले. परंतु मराठा समाजाचा जो उपकारकर्ता आहे त्यालाच समाजाचे नेते शत्रू म्हणून समाजाच्या समोर प्रस्तुत करीत आहेत, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. परंतु, राजकारणात हे सर्व चालणारच आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विविध छोट्या-छोट्या समाजाची मते व त्या मतांनी प्रभावित होणार्‍या जागा लक्षात घेऊन स्टार प्रचारकांची त्या त्या क्षेत्रामध्ये योजना करणे गरजेचे आहे. नुकतीच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. महाराष्ट्रातील महिला खूश आहेत. त्या महिलांपर्यंत पोहोचून ही योजना भाजपाने आणलेली आहे, त्यामुळे निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपालाच किंवा महायुतीला मतदान करावे अशा पद्धतीचे आवाहन प्रत्येक महिलेला करणे गरजेचे आहे. अनेक लाडक्या बहिणींची मतदार यादीमध्ये नावे नसतील. ‘आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो’ ही परिस्थिती बरोबर नाही. लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरली पाहिजे. नुसते पैसे वाटून होणार नाही. कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता ज्याच्याकडे कुठलेही दायित्व नाही, परंतु जो भाजपाचा कार्यकर्ता आहे, हितचिंतक आहे अशा लोकांना जोडून ठेवण्यासाठी अधिक प्रयासाची आवश्यकता आहे. सत्ता आली की सर्वसामान्य कार्यकर्ते हे सत्तेपासून दूर ठेवले जातात, हा अनुभव आहे. यामुळे सत्तेनंतर येणार्‍या निवडणुकीच्या वेळेला प्रचंड नाराजी पाहायला मिळते. याचाच परिणाम म्हणून सत्ताधार्‍यांना पुन्हा सत्तेमध्ये येण्यामध्ये जास्त करावे लागतात.
 
 
Haryana election : हरयाणामध्ये निवडणुकीच्या ऐन सहा महिनेआधी भाजपाने मनोरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केले व नायबसिंह सैनी या ओबीसी चेहर्‍याला समोर आणले; तो प्रयोग यशस्वी झालेला आहे. मराठा चेहरा दिसला पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पडद्यामागचे राजकारण काही असो; परंतु जनतेने हाच संदेश ग्रहण केलेला यावेळेस बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होणार, असे चित्र आहे. हरयाणामध्ये मोठमोठ्या नेत्यांना बंडखोरीमुळे बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यांच्याऐवजी निवडून येऊ शकणार्‍या लोकांना तिकीट दिले गेले व त्याचा फायदा झालेला आता दिसून येत आहे. बंडखोरीमुळे अधिक नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे.
 
 
राजकारणाच्या या धुमश्चक्रीमध्ये भाजपामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षणावर भर गेलेला नाही. सामान्य कार्यकर्त्यांना आपण कसे बोलले पाहिजे, संपर्क कसा केला पाहिजे, लोक काय प्रश्न विचारू शकतात, त्याचे काय उत्तर आहे, याचे प्रशिक्षण व साहित्य वितरित करणे गरजेचे आहे. महिला, मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी या सर्वांवर लक्ष केंद्रित करून राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांत काय केलेले आहे, हेही पाहिजे आणि आधीच्या लोकशाही आघाडीची कोरोना काळातील निष्क्रियता, त्याने लोकांचे गेलेले प्राण हा इतिहास लोकांसमोर मांडला पाहिजे. 
 
- ९५५२५३५८१३
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)
Powered By Sangraha 9.0