महिला, तरुण, शेतकरी, अल्पसंख्याकांसाठी अनेक तरतुदी

14 Oct 2024 21:29:46
- महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

नवी दिल्ली, 
Maharashtra Congress काँग्रेसच्या आज राजधानी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जाहीरनाम्याच्या मुद्यावर झाल्याचे समजते. तरुण, महिला, शेतकरी आणि अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक तरतुदी केल्या आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत खडगे यांच्या निवासस्थानी झाली. शेतकर्‍यांचे ३ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची योजना काँग्रेसने तयार केली आहे. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना असे याचे राहणार आहे. यासाठी २८ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
 
 
mahayuti
 
Maharashtra Congress राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला शह देण्यासाठी म्हणून महालक्ष्मी योजना काँग्रेस आणणार असल्याचे समजते. या योजनेनुसार, राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी ६० हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे. राज्यातील बससेवा महिलांना पूर्ण मोफत काँग्रेसची योजना आहे. सध्या महिलांना बसमध्ये ५० टक्के तिकीट लागते. यासाठी १४६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपयांचे विमासंरक्षण दिले जाणार आहे. बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार रुपये दिले जातील. राज्यातील साडेसहा लाख लोकांना योजनेचा फायदा मिळणार आहे. दलित अल्पसंख्यकांसाठी विशेष योजना राबवली जाणार आहे. चव्हाण काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असून, त्यांनी आजच्या बैठकीत जाहीरनाम्यातील हे मुद्दे मांडले, त्यावर चर्चाही झाली.
Powered By Sangraha 9.0