कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

    दिनांक :14-Oct-2024
Total Views |
- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई, 
Maharashtra State Skills University महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण असेल. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.
 
 
Maharashtra State Skills University
 
Maharashtra State Skills University राज्यातील तरुणाईला एकात्मिक, समग‘ स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्चशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले. राज्यात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प‘चंड संधी लक्षात घेता, हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावे, असा हे विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. रतन टाटा देखील याच क्षेत्राशी संबंधित होते. त्यांचा उद्देश आणि या विद्यापीठाच्या उद्देशात समानता आहे. त्यामुळे टाटांचे नाव या विद्यापीठाला दिल्याने रतन टाटांसह या विद्यापीठाला त्यांच्या नावाने प्रतिष्ठा प्राप्त झाली, असे म्हणायला हरकत