अडकलेले भारतीय प्रवासी कॅनडाच्या विमानाने शिकागाेला

    दिनांक :16-Oct-2024
Total Views |
- वायुदलाच्या विमानाने केली इक्लुइट विमानतळावरून सुटका
 
नवी दिल्ली, 
Air India aircraft बाॅम्बच्या धमकीनंतर वळवलेल्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांची 18 तासांनंतर इक्लुइट विमानतळावरून सुटका झाली. संबंध ताणलेले असतानाही कॅनडातील वायुदलाच्या विमानाने या प्रवाशांना शिकागाेला नेले. 15 ऑक्टाेबर राेजी कॅनडातील इक्लुइट येथे वळवण्यात आलेल्या विमान क्रमांक एआय-127 मधील प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानाकडे रवाना झाले, असे एअर इंडियाने साेमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले. प्रवाशांना कॅनडा वायुदलाच्या विमानात नेले जात आहे. या विमानाने इक्लुइट येथून उड्डाण केले असून, ते शिकागाेला उतरेल, असे कंपनीने म्हटले.
 
 
Air India aircraft
 
Air India aircraft एअर इंडियाचे विमान स्थानिक वेळेनुसार पहाटे 5.21 वाजता विमानतळावर उतरले हाेते. या अनपेक्षित व्यत्ययादरम्यान प्रवाशांना आणि विमान कंपनीला दिलेल्या सहकार्य आणि मदतीबद्दल एअर इंडियाने कॅनडाचे अधिकारी आणि इक्लुइट विमानतळावरील अधिकाèयांचे आभार मानले. एअर इंडियाचे बाेईंग 777-300 ईआर विमान दिल्लीहून शिकागाेला जात असताना बाॅम्बच्या धमकीनंतर मंगळवारी कॅनडाच्या विमानतळाकडे वळवण्यात आले. इक्लुइटमधील नुनावूत येथे विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले हाेते आणि चालकदलाच्या सदस्यांसह सर्व 211 प्रवाशांना विमानातून उतरवले, असे राॅयल कॅनेडियन माऊंटेड पाेलिसांनी सांगितले.