VIDEO: थुंकून रोटी बनवण्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल!

16 Oct 2024 16:48:30
Viral Video : थुंकणे आणि अन्न दूषित करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका मोलकरणीचा लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थुंकून रोटी बनवताना दिसत आहे.
 

VIRAL 
 
 
या व्हिडिओबाबत प्रचंड खळबळ उडाली असून कडक कारवाईची मागणी होत आहे.
 
अन्नात थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी योगी सरकार अध्यादेश आणणार आहे, मात्र याच दरम्यान सहारनपूरमधून एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रोटी बनवताना थुंकत आहे. दुरूनच कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
 
सहारनपूर सिटी कोतवाली भागातील चौकी सराय खलिफा हॉटेलमधून रोटीमध्ये थुंकण्याचा व्हिडिओ समोर येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये जिहादी मानसिकता असलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे शहर कोतवाली गाठले आणि हॉटेल सील करण्याची आणि हॉटेलचालक मलिकवर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Powered By Sangraha 9.0