रेल्वेत अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी मोहीम

17 Oct 2024 19:59:41
नागपूर, 
Unauthorized sale in railways : रेल्वे स्थानक तसेच अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने धडक मोहीम राबवली. रेल्वेच्या ३ निरीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पाच विक्रेत्यांना अटक करण्यात आली.
 
 
TRAIN
 
 
रेल्वेत बेकायदेशीरपणे शिजवलेले खाद्यपदार्थ, अनधिकृत पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स, शीतपेये आणि चहा, कॉफी विक्रेत्यांवर खापरी स्टेशन ओलांडल्यानंतर पथकाने कारवाई केली. रेल्वेच्या पथकाने कारवाई दरम्यान चार अनधिकृत विक्रेत्यांना पकडले. पाच विक्रेत्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिली आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सर्व रेल्वेगाडयांमध्ये अचानक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या व्यावसायिक निरीक्षकांच्या पथकाने नागपूर स्थानकापासून ही कारवाई सुरु केली आहे. पथकाने या विक्रेत्यांना बुटीबोरी स्थानकावर उतरविले. तसेच जप्त केलेल्या वस्तू आणि बनावट रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविले आहे.
 
Powered By Sangraha 9.0