...तेव्हा झारखंडला मिळाले पहिले मुख्यमंत्री !

बाबुलाल मरांडी झाले पहिले मुख्यमंत्री

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
झारखंडमध्ये 13 आणि 20 नाेव्हेंबर  babulal marandi अशा दाेन टप्प्यात विधानसभा निवडणूक हाेत आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2000 मध्ये बिहारच्या दक्षिणेकडील काही जिल्हे मिळून झारखंड हे नवीन राज्य तयार करण्यात आले. यावेळी हाेत असलेली निवडणूक ही झारखंड विधानसभेची पाचवी आहे. अविभाजित बिहार विधानसभेत 324 सदस्य हाेते. झारखंड राज्याची निर्मिती हाेण्याच्या आधीच बिहार विधानसभेची निवडणूक झाली हाेती. त्यामुळे झारखंड हे वेगळे राज्य झाल्यानंतर बिहार विधानसभेवर निवडून आलेले 81 आमदार पहिल्या झारखंड विधानसभेचे अविराेध सदस्य झाले. झारखंड विधानसभेसाठी पुन्हा वेगळी निवडणूक त्यावेळी घेण्यात आली नव्हती. एका आमदाराची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना हाेता, त्यामुळे झारखंड विधानसभेची सदस्यसंख्या 82 हाेती. हेही वाचा : आर्वीत तिकीट जाहीर झाली म्हंते रे बाप्पा
 
 

babulal marandi 
 
झारखंड राज्य अस्तित्वात आल्यानंतर babulal marandi राज्यात त्रिशंकू विधानसभेसारखी स्थिती हाेती. काेणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. भाजपा सर्वांत माेठा पक्ष ठरला हाेता. त्यामुळे भाजपाने राज्यातील काही छाेटे पक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्याने राज्यातील आपले पहिले सरकार स्थापन केले. भाजपाजवळ 32 आमदार हाेते. समता पक्षाच्या 5 तर जदयुच्या 3 आमदारांच्या पाठिंब्याने भाजपाने बहुमताच्या जवळ जाणारा 40 चा आकडा गाठला आणि सरकार स्थापन केले. झारखंड मुक्ती माेर्चाचे 12, काँग्रेसचे 11 तर राजदचे 9 आमदार हाेते. भाकपचेही 3 आमदार निवडून आले हाेते. सहा अपक्षांनाही विजय मिळाला हाेता. या सहा अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा भाजपाने गाठला हाेता. 
 
बिहार विधानसभा निवडणुकीच्या babulal marandi आधीच भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुलाल मरांडी 1999 मध्ये लाेकसभेवर निवडून आले हाेते. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात त्यांचा पर्यावरण राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर बाबुलाल मरांडी यांना झारखंडचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले. मुख्यमंत्री झाले तेव्हा मरांडी आमदार नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना आमदार व्हायचे हाेते. कारण, खासदार असतानाच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हाेती.