आगामी ३ महिन्याच्या काळात कामगार सर्वेक्षण होणार

17 Oct 2024 21:13:34
नागपूर,
labor survey : राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या सर्वेक्षणात केलेल्या शिफारशींवर पुढील तीन महिन्याच्या काळात सांख्यिकी कार्यालया तर्फे कामगार सर्वेक्षण आहे. सर्वेक्षणात सर्व निकष पाळली जावीत. तसेच सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या प्रश्नोत्तरात अवलंबली गेली पाहिजे, यासाठी अधिकारी वर्गाने या प्रशिक्षणाला गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला यांनी केले.
 
 
 ICL
 
 
कामगार सांख्यिकी शास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भारतीय खाण ब्यूरो, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स येथे झाली. एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन उप्पला यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रामुख्याने उपमहासंचालक अल्ताफ हुसैन, उपमहासंचालक तारकचंद पात्रा आदींची उपस्थिती होती.
 
 
आयसीएलएसच्या परिषदेतून संमत झालेले ठराव आणि त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी केला जाणारा सर्वे हा अचूक असावा जेणेकरून भारतातील कामगार वर्गाची योग्य माहिती उपलब्ध होईल यासाठी सदर प्रशिक्षण उपयोगी राहणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय उपमहासंचालक अल्ताफ हुसेन यांनी व्यक्त केला.
 
 
सांख्यिकी कार्यालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणार्‍या पिरॉडिक लेबर फोर सर्वे अर्थात नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणामधील संकल्पना आयसीएलएसच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वापरून हा सर्वे पूर्ण करण्यात येणार आहे.आयसीएलएसच्या अहवालानुसार कामगार वर्गाचे पाच भागात विभाजन करण्यात आले असून प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी माहिती उपलब्ध होणार असल्याची भावना तारकचंद पात्रा यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सांख्यिकी अधिकारी प्रशिक्षण वर्गात १०० क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0