सराईत गुन्हेगार नरेंद्र स्थानबद्ध

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
देवळी, 
stationed in jail : सराईत गुन्हेगार नरेंद्र उर्फ नरेश कांबळे (37) रा. टिळकनगर याला एमपीडीए अंतर्गत येथील कारागृहात 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले.
 

HJHJK 
 
 
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार नरेंद्र कांबळेविरुद्ध मारहाण करणे, अवैध गावठी दारू विक्री करणे, विदेशी दारू बाळगून विक्री करणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याचे गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार त्याला येथील मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले.